लातूर पाणी प्रकल्प

लातूर जिल्ह्यात प्रकल्प कोरडेठाक; मोठ्या पाणी संकटाची चाहूल, शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष!

Latur Water Project: अर्धा पावसाळा सरला तरी लातूर जिल्ह्यात आतापर्यंत अपेक्षित सरासरी पावसाने गाठली नाही. त्यामुळे जिल्ह्यापुढे सद्यस्थितीत मोठे पाणी संकट वाढून ठेवले आहे.

लातूर जिल्ह्यात प्रकल्प कोरडेठाक; मोठ्या पाणी संकटाची चाहूल, शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष!

Latur Water Project

महादेव कुंभार 
लातूर (Latur Water Project) :
अर्धा पावसाळा सरला तरी लातूर जिल्ह्यात आतापर्यंत अपेक्षित सरासरी पावसाने गाठली नाही. त्यामुळे जिल्ह्यापुढे सद्यस्थितीत मोठे पाणी संकट वाढून ठेवले आहे. लातूर जिल्ह्यातील मोठे प्रकल्प, मध्यम प्रकल्प आणि लघुपाटबंधारे प्रकल्पांमध्ये आजघडीला केवळ 14 टक्के उपयुक्त पाणीसाठा असून मांजरा धरणात केवळ 14 टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील तिरू, मसाला हे प्रकल्प कोरडेठाक असून व्हटी, देवर्जन व तावरजा या (Latur Water Project) प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत केवळ 6 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात पावसाअभावी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असतानाही या परिस्थितीकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. 

लातूर जिल्ह्यात मोठे प्रकल्प (Latur Water Project) , मध्यम प्रकल्प आणि लघु पाटबंधारे असे एकूण 145 प्रकल्प आहेत. मांजरा नदीवरील धनेगाव येथील मांजरा धरण आणि तेरणा नदीवरील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्प हे दोन मोठे प्रकल्प असून या प्रकल्पांची पाणीपातळी ही सध्या समाधानकारक नाही. मांजरा धरणामध्ये केवळ 14 टक्के तर निम्न तेरणा प्रकल्पात 25 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

लातूर जिल्ह्यात एकूण आठ मध्यम प्रकल्प आहेत. त्यापैकी मसलगा आणि तिरू नदीवरील प्रकल्प (Latur Water Project) या दोन्ही प्रकल्पांमध्ये सध्या पाणीच नाही. तावरजा नदीवरील तावरजा मध्यम प्रकल्प 7.8, रेणा नदीवरील रेना मध्यम प्रकल्प 23 टक्के, व्हटी प्रकल्पात 6.8 टक्के देवर्जन प्रकल्पात 6.99 टक्के, साकोळ मध्यम प्रकल्पात 7.95 टक्के तर घरणी मध्यम प्रकल्पात 14.98 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. जिल्ह्यात एकूण असलेल्या 135 लघुपाटबंधारे प्रकल्पांमध्ये सरासरी 14.79 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे यातील जवळपास सर्वच प्रकल्प कोरडेठाक आहेत.

लातूर जिल्ह्यात मांजरा, तेरणा, तावरजा व तिरू या नद्यांवर बॅरेज आणि उच्च पातळी बंधारे आहेत. या एकूण बंधाऱ्यांची संख्या 35 इतकी आहे. यापैकी टाकळगाव देवळा हा मांजरा नदीवरील उच्च पातळी बंधारा, लासरा येथील बॅरेज आणि वांजरखेडा येथील बॅरेज हे तीन बॅरेज सोडले तरी इतर सर्व बॅरेज जवळपास कोरडे आहेत. टाकळगाव देवळा बंधाऱ्यात 50 टक्के, लासरा 29 तर वांजरखेडा येथील गॅरेजमध्ये 26 टक्के पाणी शिल्लक आहे. कवी नारायण सुमंत यांच्या ओळीत सांगायचे तर 'धरण झाले बांधुनी अन् पावसाळा कोरडा...' अशी परिस्थिती सध्या जिल्ह्यात आहे.

पावसाची आकडेवारी चिंताजनक!

लातूर जिल्ह्यात यंदाचा पावसाळा जवळपास कोरडा गेल्यात जमा आहे. जमिनीची तहान अद्यापही भागली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक वाहवणी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आतापर्यंत एकही ओढा, नाला व नदीला पाणी येईल, असा पाऊस झाला नाही. परिणामी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. (Latur Water Project) लातूर जिल्ह्यात शिरूर अनंतपाळ तालुक्यात सर्वाधिक म्हणजे अपेक्षित सरासरीच्या 97 टक्के, त्या खालोखाल उदगीर तालुक्यात 92 टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील लातूर तालुक्यात सर्वात कमी म्हणजे 66 टक्के, जळकोट तालुक्यात 67 टक्के तर चाकूर तालुक्यात 73 टक्के पाऊस झाला आहे. पावसाची ही आकडेवारी चिंताजनक आहे.

संबंधित सामग्री

दोन दिवसांचा पगार काढण्यास भाजपाचा विरोध; महापालिकेतील बेमुदत बंद प्रकरणावर गटनेते दीपक मठपतींची भूमिका

दोन दिवसांचा पगार काढण्यास भाजपाचा विरोध; महापालिकेतील बेमुदत बंद प्रकरणावर गटनेते दीपक मठपतींची भूमिका

मुदत बंदमुळे शहरातील नागरिकांना पाणी मिळाले नाही, असा आरोप भाजपाचे गटनेते ॲडव्होकेट दीपक मठपती यांनी केला.

Aug 22, 2026