लातूर जिल्हा परिषद

जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा; लातूर जि. प. सभेत ठराव! 

Latur Zilla Parishad: लातूर जिल्ह्यात पाऊस नसल्याने हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. शेतकरी संकटात असून शासनाने लातूर जिल्ह्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी

जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा; लातूर जि. प. सभेत ठराव! 

Latur Zilla Parishad

लातूर (Latur Zilla Parishad) : गेले दीड महिन्यापासून लातूर जिल्ह्यात पाऊस नसल्याने हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. शेतकरी संकटात असून शासनाने लातूर जिल्ह्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी तसेच दुष्काळी उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी घेऊन जिल्हा परिषदेत सोयाबीनच्या काळासह पोहोचलेल्या जिल्हा परिषद सदस्यांनी एल्गार करताच जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव मंजूर करून तो शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. 

लातूर जिल्हा परिषदेची (Latur Zilla Parishad) सर्वसाधारण सभा मंगळवारी दुपारी सुरू झाली. या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या चोरीचा विषय प्रामुख्याने पहिल्यांदा चर्चेसाठी आला. या विषयावर जवळपास तीन तास मॅरेथॉन चर्चा सुरू झाली. मात्र या चर्चेतून र्व काही संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यावर शेकणार असल्याचे लक्षात येतात व यातून शासनाचीच बदनामी होणार असल्याचे लक्षात येताच अखेर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या विषयावर चौकशी समिती नेमण्याचा मधला मार्ग काढून हा विषय पाठीमागे टाकण्यात आला. 

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा (Latur Zilla Parishad) सुरू असताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय टेकाळे आणि माणिकराव गायकवाड यांच्यासह काही सदस्यांनी वाळलेले सोयाबीनचे काड घेऊन घोषणा देत जिल्हा परिषदेचे सभागृह गाठले. सभागृहात जाऊन जिल्हा परिषद अध्यक्षांच्या समोर हे कारड ठेवण्यात आले. जवळपास दीड महिन्याचा पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्याने सोयाबीनमध्ये शेंगा भरल्या नाहीत. उभे सोयाबीन वाळवून गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडला आहे. शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची नुकसान भरपाई द्यावी. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची नुकसान भरपाई द्यावी. जनावरांना चारा छावणीला नको तर दावणीला द्यावा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे. अशा मागण्या यावेळी सदस्यांनी मांडल्या. 

सभागृहातील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी या मागणीला पाठिंबा दिला. अखेर दुष्काळ जाहीर करण्याचा मागणीचा ठराव घेत तो शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. हा ठराव जिल्हा परिषद सगळे पुढे घेतल्याने आंदोलनकर्त्या सदस्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षासह उषाताई पाटील व सर्व अधिकाऱ्यांचे पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. सभेच्या विषय पत्रिकेतील एकूण बारा विषयावर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

टैग्स: Latur Zilla Parishad

संबंधित सामग्री

लातूर जि. प. ची लक्तरे टांगली वेशीवर!

लातूर जि. प. ची लक्तरे टांगली वेशीवर!

Latur Zilla Parishad: 'स्वच्छ भारत मिशन' जिल्हाभरात राबविणाऱ्या लातूर जिल्हा परिषदेत सर्वसामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही. लिफ्ट महिनोंमहिने बंद आहे. सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य

Sep 01, 2026
कारभाऱ्यांच्या भत्ता वाढीचा आजच्या जि. प. सभेत विषय

कारभाऱ्यांच्या भत्ता वाढीचा आजच्या जि. प. सभेत विषय

लातूर जिल्हा परिषदेतील पदाधिकारी व सदस्य तसेच पंचायत समिती सदस्यांच्या भत्त्यात वाढ करण्याचा महत्त्वाचा विषय आज होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चेसाठी येणार आहे.

Jul 06, 2026
37 कोटी 78 लाख 61 हजार रुपये खर्चाचे जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक!

37 कोटी 78 लाख 61 हजार रुपये खर्चाचे जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक!

लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड 16 मार्च रोजी झाली असली तरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक यांच्याकडे 12 मार्च 2026 रोजी सर्वसाधारण सभा

Mar 19, 2026