चाकूर (Chakur Government Rest House) : शहराच्या वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार असून, सुमारे २ कोटी ५४ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या भव्य शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा उद्या, शनिवार (१५ ऑगस्ट) रोजी सकाळी ११. ३० वाजता थाटात पार पडणार आहे. या भव्य इमारतीचा लोकार्पण सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या शुभहस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील राहणार आहेत.
चाकूर विधानसभा मतदारसंघात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विशेष लक्ष घातल्याने विविध विकासकामांना गती मिळत असल्याचे चित्र आहे. शहरासह ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, रस्ते, शासकीय इमारती आणि नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने विकासकामांना चालना मिळत आहे. त्यामुळे चाकूरच्या विकासाच्या दृष्टीने बाबासाहेब पाटील यांच्या कार्याचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
शासकीय विश्रामगृहाची (Chakur Government Rest House) ही भव्य इमारत चाकूरच्या विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. प्रशस्त आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या इमारतीमुळे चाकूर येथे शासकीय कामानिमित्त येणारे अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे. या इमारतीच्या माध्यमातून चाकूर शहराच्या विकासाला आणखी एक नवी ओळख मिळणार असून, शहराच्या सौंदर्यातही भर पडणार आहे. विकासकामांना प्राधान्य देत चाकूर मतदारसंघात विविध प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडून सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे नागरिकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे.
लोकार्पण सोहळ्यास चाकूर मतदारसंघातील विविध मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्याकडे चाकूरकरांचे लक्ष लागले असून, भव्य शासकीय विश्रामगृहाचे लोकार्पण पाहण्यासाठी नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
चाकूरच्या वैभवात भर; २ कोटी ५४ लाखांच्या शासकीय विश्रामगृहाचे उद्या लोकार्पण
Chakur Government Rest House:
Chakur Government Rest House
संबंधित सामग्री
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा
मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत
फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक
तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी
पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.