हिंगोली (Hingoli Hearse) : आरोग्य विभागात नव्याने दाखल झालेल्या तीन शववाहिका धूळखात पडून या संदर्भात दै. देशोन्नतीने वृत्त प्रसिध्द होताच तीनही शववाहिका जिल्हा व तालुकास्तरावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली.
या बाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वैâलास शेळके यांनी दिलेली माहिती अशी की, जिल्ह्यासाठी तीन शववाहिका ह्या जून २०२५ रोजी शववाहिका सेवा अभियंता परिवहन मंडळ हिंगोली यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सूचना नुसार १ जिल्हास्तरावर व २ तालुकास्तराव वर्ग करण्याची कारवाई सुरू आहे. मागणीपत्र प्राप्त न झाल्याने त्या वर्ग करीता आल्या नाही. त्यामुळे २ दिवसात मागणीपत्र प्राप्त करून शववाहिका वर्ग केल्या जातील अशी माहिती देण्यात आली आहे.
हिंगोली शववाहिका
तीन शववाहिका जिल्हा व तालुका स्तरावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू
Hingoli Hearse: हिंगोली जिल्ह्यात तीन शववाहिका धूळखात पडल्यामुळे आरोग्य विभागाने दिशा निदेशांवर आधारित जिल्हा/तालुकासतरावर श्रेणीकरण सुरू केले आहे.
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Hingoli Hearse