गोवंश हत्या कडक कारवाई

गोवंश हत्या करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करणार: पोलीस निरीक्षक जमीर नाईक

Cattle slaughter strict action: कळमनुरीत पोलीस निरीक्षक जमीर नाईक यांनी गोवंश हत्या करण्यावर कडक कारवाईचा निर्णय घेतला. अवैध गोवंश कत्तल करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

गोवंश हत्या करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करणार: पोलीस निरीक्षक जमीर नाईक

Cattle slaughter strict action

कळमनुरी (Cattle slaughter strict action) : कळमनुरी शहरात गोवंश हत्या करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे तरी शासनाच्या नियमांनुसार कोणत्याही जनावराची अवैध कत्तल करू नये, तसे आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा  पोलीस निरीक्षक जमीर नाईक यांनी बैठकीत दिला आहे. सात जून रोजी पोलीस निरीक्षक जमीर नाईक यांचे प्रमुख उपस्थितीत कळमनुरी पोलीस स्टेशन  येथे शहरातील कुरेशी / खाटीक समाजाची बैठक घेण्यात आली.

या बैठकीत समाजातील नागरिकांना गोवंश हत्या न करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच (Cattle slaughter strict action) गोमांसाची आयात-निर्यात अथवा विक्री करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. यावेळी अवैध प्रकार करताना कोणी आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा कडक सूचना पोलीस प्रशासनाकडून देण्यात आल्या. बैठकीस उपस्थित सर्वांनी शासनाने प्रतिबंधक केलेले गोहत्या करणार नसल्याची संमती दर्शवली. सदर बैठकीस कुरेशी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित सामग्री

वाढत्या तापमानामुळे गायीचा मृत्यू; प्राणी मित्रांनी केले गाईवर अंत्यसंस्कार

वाढत्या तापमानामुळे गायीचा मृत्यू; प्राणी मित्रांनी केले गाईवर अंत्यसंस्कार

Hingoli Cow Deaths: हिंगोलीच्या गंगानगर येथे तापमानामुळे गाईच्या मृत्यूची दुःखद घटना घडली. समावेशी प्राणी मित्रांनी सांस्कृतिक अंतिम संस्कार केले आणि जनावरांचा पाणी, सावल्याची व्यवस्था

Jun 11, 2026
परभणीत कत्तलीसाठी आणलेले १८ गोवंश जनावरे जप्त

परभणीत कत्तलीसाठी आणलेले १८ गोवंश जनावरे जप्त

Slaughter of cattle: पाथरी पोलिसांनी कत्तलीसाठी आणलेले १८ गोवंश जनावर एका शेडमध्ये आढळून आले. या घटनेत आरोपी नूरमिया शहाबुद्दीन यावर गुन्हा दाखल झाला. पोलिसांची कारवाई बेकायदेशीर कृत्यांविरोधात होती.

Jun 07, 2026
हिंगोलीत गायीला राष्ट्रीय पशू घोषित करण्याची मागणी

हिंगोलीत गायीला राष्ट्रीय पशू घोषित करण्याची मागणी

National Animal Cow: विराट राष्ट्रीय लोकमंच मागणी करत आहे की, गायीला भारतात राष्ट्रीय पशू म्हणून घोषित केला जावे. या निवेदनात गोवंशाचा संरक्षण आणि गोहत्यावर होणारे राजकारण .

May 28, 2026
परभणीत कत्तलीसाठी गोवंशाची वाहतुक करणार्‍या दोघांना अटक

परभणीत कत्तलीसाठी गोवंशाची वाहतुक करणार्‍या दोघांना अटक

Parbhani cattle slaughter: तालुक्यातील बोरी येथे कत्तल करण्याच्या हेतूने चार बैल व एका गाईची बेकायदेशीररित्या अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर बोरी पोलिसांनी सापळा

May 21, 2026
परभणीत गोवंश कत्तलीच्या कारवाई दरम्यान पोलिसांवर दगडफेक?

परभणीत गोवंश कत्तलीच्या कारवाई दरम्यान पोलिसांवर दगडफेक?

Parbhani Cattle slaughter: परभणीतील सेलू शहरात गोवंश कत्तली कारवाई दरम्यान पोलिसांवर दगडफेक करून शासकीय कामात अडथळा आणण्याची घटना घडली. पाच आरोपींना ताब्यात घेतले.

Mar 29, 2026