पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती

लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण आता बायोमेट्रिक पद्धतीनेच; सहकार आयुक्तालयाचे निर्देश

Farm Loan Waiver Scheme: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण व ॲग्रीस्टॅक, आधार नोंदणीची प्रक्रिया अधिक प्रभावी

लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण आता बायोमेट्रिक पद्धतीनेच; सहकार आयुक्तालयाचे निर्देश

Farm Loan Waiver Scheme

हिंगोली (Farm Loan Waiver Scheme) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण व ॲग्रीस्टॅक, आधार नोंदणीची प्रक्रिया अधिक प्रभावी व सुरक्षित करण्यासाठी आधार प्रमाणीकरणाची सुधारित कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे. यासंदर्भात सहकारचे अपर आयुक्त व विशेष निबंधक (सहकारी संस्था) नागनाथ यगलेवाड यांनी सर्व संबंधित यंत्रणांना निर्देश दिले आहेत.

शासन निर्णयानुसार, योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे तसेच ॲग्रीस्टॅक आधार नोंदणी अनिवार्य आहे. त्यानुसार, योजनेच्या संगणकीय प्रणालीवर कर्ज खात्यांची माहिती अपलोड करण्यात आली असून, माहितीची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. नवीन कार्यपद्धतीनुसार, आधार प्रमाणीकरण केवळ बायोमेट्रिक पद्धतीने करण्यात येणार असून, ओटीपीद्वारे आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध राहणार नाही. यामुळे लाभार्थ्यांची अचूक ओळख सुनिश्चित होऊन योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक होणार आहे.

या (Farm Loan Waiver Scheme) संदर्भातील कार्यपद्धतीची माहिती व आवश्यक सूचना सर्व जिल्हा उपनिबंधक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राज्यस्तरीय बँकर्स समिती तसेच संबंधित बँक शाखांना तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, आपल्या सरकार सेवा केंद्रे व बँक शाखांमध्ये आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरळीतपणे राबविण्यासाठी आवश्यक समन्वय ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

संबंधित सामग्री

दुसऱ्या टप्प्यात 6.36 लाख शेतकऱ्यांना 5,086 कोटींचा दिलासा, मराठवाडा आघाडीवर

दुसऱ्या टप्प्यात 6.36 लाख शेतकऱ्यांना 5,086 कोटींचा दिलासा, मराठवाडा आघाडीवर

Farm Loan Waiver Scheme: राज्य शासनाच्या राजमाता अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 च्या दुसऱ्या टप्प्यातील अनुदान वितरणाचा अहवाल 24 ऑगस्ट 2026 रोजी जाहीर झाला आहे.

Aug 25, 2026
हिंगोली जिल्ह्यात 12 हजार 252 ई-केवायसी प्रलंबित, एसबीआयमध्ये सर्वाधिक प्रकरणे

हिंगोली जिल्ह्यात 12 हजार 252 ई-केवायसी प्रलंबित, एसबीआयमध्ये सर्वाधिक प्रकरणे

Hingoli e-KYC: जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयीकृत, ग्रामीण आणि सहकारी बँकांमध्ये ई-केवायसीची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. 12 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारी

Aug 12, 2026
धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस तात्काळ द्या; तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस तात्काळ द्या; तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

Farmer Paddy Bonus: महाराष्ट्र शासनाने धान बोनस नितांत तात्काळ शेतकऱ्यांना देण्याची मागणी युवक काँग्रेसने तहसिलदारांच्या मार्गदर्शनात मुख्यमंत्र्यांना सादर केली.

May 27, 2026
धानाचे चुकारे व बोनससाठी काँग्रेसचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

धानाचे चुकारे व बोनससाठी काँग्रेसचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

Paddy Payments-Bonus: कोरची तालुका शेतकऱ्यांना आर्थिक संकटात असल्यामुळे धानाचे चुकारे अद्याप मिळाले नसल्यामुळे काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना निवेदन

May 19, 2026