परभणी कर्जमाफी आंदोलन

परभणीत कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप; सेलू तहसिल कार्यालयासमोर आंदोलन...!

Parbhani Loan Waiver Andolan: विश्वस्त कृषक नेतृत्वाखाली शासनाच्या करजमाफी आदेशावर महाराष्ट्रातील सेलू तहसीलात आंदोलन झाले. लाखो शेतकर्यांना फायदा न देण्याच्या आरोपासाठी निषेध मागणी करत राहिली.

परभणीत कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप; सेलू तहसिल कार्यालयासमोर आंदोलन...!

Parbhani Loan Waiver Andolan

परभणी (Parbhani Loan Waiver Andolan) : सेलू  शहरात शासनाने कर्जमाफी जाहीर केली आहे. परंतू या आदेशानूसार लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहे. कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी गुरूवार ११ जून रोजी तहसिल कार्यालयासमोर शासन आदेशाची होळी करत निषेध नोंदवीला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीवेळी शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देत ३० जूनपर्यंत कर्जमाफी करण्यासाठी आदेश जाहीर केला. या आदेशानूसार लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. शेतकरी नेत्यांनी राज्यभर या (Parbhani Loan Waiver Andolan) आदेशाची होळी करत निषेध नोंदविला. गुरूवार ११ जून रोजी सेलू येथील तहसिल कार्यालय परिसरात आदेशाची होळी करत निवेदन तहसिलदारांना देण्यात आले. किसान सभेचे शेतकरी नेते कॉ.अजित नवले यांनी पहिल्या दिवसापासून शासन आदेशाचा विरोध केला.

सलू येथील आंदोलनात कॉ.रामेश्वर पौळ, रामकृष्ण शेरे, दत्तूसिंग ठाकूर, उध्दव पौळ, सुभाष शहाणे, रोहिदास हातकडके, बाळू पौळ, रंगनाथ ताठे, शिवाजी पौळ, गणपत गोंडगे, शांतीराम पौळ, धोंडीराम पातळे, नारायण पवार, भगवान वाव्हळ, पंडित आवटे, सचिन गाडेकर, राजेभाऊ पौळ, दत्ता बादाड आदी सहभागी झाले.