चिखली ग्रामपंचायत आरक्षण

चिखली तालुक्यातील 61 ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

Chikhali Gram Panchayat Reservation: चिखली तालुक्यात राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 61 ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांच्या आरक्षण सोडतीसाठी विशेष ग्रामसभा 10-11 जून 2026 रोजी आयोजित

चिखली तालुक्यातील 61 ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

Chikhali Gram Panchayat Reservation


10 व 11 जून रोजी विशेष ग्रामसभा; नागरिकांनी उपस्थित राहण्याचे तहसीलदारांचे आवाहन

चिखली (Chikhali Gram Panchayat Reservation) : राज्य निवडणूक आयोगाच्या 26 मे 2026 रोजीच्या आदेशानुसार राज्यातील मुदत संपलेल्या व मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्य पदांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार चिखली तालुक्यात सन 2026 मध्ये मुदत संपणाऱ्या 60 आणि एका नवनिर्मित अशा एकूण 61 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रभागनिहाय सदस्य आरक्षण निश्चित करण्यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या आहेत.

तहसील प्रशासनाच्या माहितीनुसार, 10 जून 2026 रोजी अमडापूर, धोत्रा नाईक, हरणी, बोरगाव काकडे, भोरसा-भोरसी, आमखेड, कवठळ, काटोडा, खैरव, रोहडा, गोद्री, माळशेंबा, पळसखेड दौलत, सोमठाणा, शेलुद, टाकरखेड हेलगा, करवंड, दहिगाव, धोत्रा भणगोजी, पेठ, टाकरखेड मु., आंत्री खेडेकर, मलगी, अमोना, वसंतनगर, शेळगाव आटोळ, मालगणी, आंत्री कोळी, सावरगाव डुकरे व केळवद या ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा होणार आहेत.

तसेच 11 जून 2026 रोजी इसोली, तोरणवाडा, वैरागड, तेल्हारा, एकलारा, नायगाव बु., गांगलगाव, भालगाव, कोलारा, चांधई, खोर, साकेगाव, येवता, दिवठाणा, सवणा, वळती, शेलसुर, मंगरुळ नवघरे, शेलोडी, शिंदी हराळी, उत्रादा, मेरा बु., मुरादपूर, भरोसा, अंचरवाडी, मंगरुळ इ., देऊळगाव धनगर, हातणी, भोगावती, ब्रम्हपुरी आणि किन्होळा या ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण निश्चितीसाठी (Chikhali Gram Panchayat Reservation) विशेष सभा घेण्यात येणार आहेत.

सदर सर्व सभा संबंधित ग्रामपंचायत मुख्यालयांवर अध्यासी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येणार असून, ग्रामपंचायत सदस्य पदांच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडणार आहे. या विशेष ग्रामसभांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरक्षण प्रक्रियेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन तहसीलदार विजय सवडे यांनी केले आहे.

संबंधित सामग्री

ग्रामपंचायत निवडणुकांना पुन्हा विलंबाची शक्यता; SIR मुळे निवडणूक कार्यक्रम लांबणीवर?

ग्रामपंचायत निवडणुकांना पुन्हा विलंबाची शक्यता; SIR मुळे निवडणूक कार्यक्रम लांबणीवर?

SIR प्रक्रियेमुळे ग्रामपंचायत निवडणुका लांबण्याची शक्यता; ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी, तर जानेवारी २०२७ मध्ये निवडणुकीची शक्यता.

Sep 15, 2026
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर आता प्रशासकराज; विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर आता प्रशासकराज; विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती

मुदत संपलेल्या व निवडणुका प्रलंबित ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त केले जाणार. विस्तार अधिकाऱ्यांकडे कारभार सोपवण्याचा ग्रामविकास विभागाचा निर्णय.

Sep 09, 2026
कोटगुलमधील आदिवासींच्या गंभीर प्रश्नांवर भाजप युवा मोर्चा आक्रमक

कोटगुलमधील आदिवासींच्या गंभीर प्रश्नांवर भाजप युवा मोर्चा आक्रमक

BJP Yuva Morcha: नगरपरिषद सांस्कृतिक भवन, देसाईगंज (वडसा) येथे झालेल्या आढावा बैठकीत कोरची तालुक्यातील कोटगुल व परिसरातील आदिवासी बांधवांच्या प्रलंबित व गंभीर प्रकरणांबाबत भाजप युवा मोर्चा

Aug 12, 2026
हिंगोली तालुक्यातील ९५ ग्रा.पं. आरक्षण  सोडतीचा कार्यक्रम जाहिर

हिंगोली तालुक्यातील ९५ ग्रा.पं. आरक्षण  सोडतीचा कार्यक्रम जाहिर

Gram Panchayat Reservation: हिंगोली तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतींच्या २०२४, २०२५ व २०२६ मध्ये संपणाऱ्या निवडणुकांसाठी ५०% आरक्षण सोडत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Jun 07, 2026
मलकापूर तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; १० व ११ जून रोजी विशेष ग्रामसभांचे आयोजन

मलकापूर तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; १० व ११ जून रोजी विशेष ग्रामसभांचे आयोजन

३४ ग्रामपंचायतींसाठी प्रभागनिहाय सदस्य आरक्षण निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार समाधान सोनवणे यांनी दिली.

Jun 06, 2026