रेगडी चक्का जाम आंदोलन

घोट-रेगडी रस्ता झाला खड्डेमय; उद्याला रेगडीत भव्य चक्का जाम आंदोलन

Regdi Chakka Jam Andolan: घोट रेगडी माघारचे खड्डेमय अवस्थासाठी घालवलेल्या जन आंदोलनेत १३ जुलैला भाजपा बंगाली आघाडीच्या सूरेश शहेची नेतृत्व होईल.

घोट-रेगडी रस्ता झाला खड्डेमय; उद्याला रेगडीत भव्य चक्का जाम आंदोलन

Regdi Chakka Jam Andolan

घोट (Regdi Chakka Jam Andolan) : घोट-रेगडी मार्गाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून संपूर्ण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यामुळे वारंवार अपघात होत असून वाहनधारक,शेतकरी, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार, दि. १३ जुलै २०२६ रोजी रेगडी (मुख्य चौक) येथे भव्य चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. या (Regdi Chakka Jam Andolan) आंदोलनातून घोट-रेगडी मार्गाचे तातडीने नूतनीकरण करण्याची जोरदार मागणी करण्यात येणार आहे.

रस्ता अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असून प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत. मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे आता रस्त्याच्या प्रश्नावर जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या (Regdi Chakka Jam Andolan) आंदोलनाचे नेतृत्व भाजपा बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा करणार आहे,परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. "आमचा रस्ता,आमचा हक्क" या घोषणेसह प्रशासनाला जागे करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

संबंधित सामग्री

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- ३६१वरील भाटेगाव कालव्यावरील वळणावर पुन्हा अपघात

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- ३६१वरील भाटेगाव कालव्यावरील वळणावर पुन्हा अपघात

National Highway Accident: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील अपघाताची मालिका सुरूच असताना जिल्हा प्रशासकीय यंत्रणा अद्यापही कुंभकर्णी झोपेमध्येच दिसून येत आहे.

Aug 31, 2026
घाणीच्या ठिकाणी चिखली नगराध्यक्षांचा २ तास ठिय्या; ‘स्वच्छ चिखली, सुंदर चिखली’साठी थेट पुढाकार

घाणीच्या ठिकाणी चिखली नगराध्यक्षांचा २ तास ठिय्या; ‘स्वच्छ चिखली, सुंदर चिखली’साठी थेट पुढाकार

Chikhali Mayor Andolan: स्वच्छ चिखली, सुंदर चिखली’चा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी चिखली नगरपालिकेचे नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी रविवारी (२३ ऑगस्ट) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले.

Aug 23, 2026
लातूर महापालिकेतील काम बंद आंदोलन स्थगित!

लातूर महापालिकेतील काम बंद आंदोलन स्थगित!

Latur Municipal Protest: लातूर महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव यांच्या कक्षामध्ये पालिका नगररचना विभागाचे प्रमुख अक्षय तळदकर यांना झालेल्या कथित मारहाणीच्या निषेधार्थ

Aug 19, 2026
हिंगोलीत नाले सफाईचे पितळ पडले उघड, जलेश्वर तलावात जाणार्‍या पाण्यावर कचराच कचरा

हिंगोलीत नाले सफाईचे पितळ पडले उघड, जलेश्वर तलावात जाणार्‍या पाण्यावर कचराच कचरा

Hingoli Drains Cleaning: हिंगोलीतील नाल्यांचा संपूर्ण सफाई केल्यानंतरही कचरा जलेश्वर तलावात सीधं प्रवाहतो, घरगुती अवशेष पिशव्या, थर्माकॉल इत्यादी दूषित करत आहे.

Aug 18, 2026
मूलभूत सुविधा पुरविण्या चे मागणीसाठी ढोल बजाओ आंदोलन

मूलभूत सुविधा पुरविण्या चे मागणीसाठी ढोल बजाओ आंदोलन

Dhol Bajao Andolan : शहरातील वाढती अस्वच्छता, अनियमित पाणीपुरवठा, बंद पथदिवे, कचरा व्यवस्थापनाचा अभाव आणि बंद पडलेल्या उद्यानांच्या प्रश्नांकडे नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी समस्त कळमनुरी शहर..

Aug 13, 2026