परभणी आरक्षण आसूड मोर्चा

परभणीत उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी आरक्षण आसूड मोर्चा धडकला....!

Parbhani Reservation Marcha: परभणीत मातंग समाज बांधवांनी जिल्हा प्रशासनावर आरक्षणासाठी मोर्चा करून आरक्षण उपवर्गीकरणाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आग्रह व्यक्त केले.

परभणीत उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी आरक्षण आसूड मोर्चा धडकला....!

Parbhani Reservation Marcha

 

अनु.जाती उपवर्गीकरण निर्णयाची अंमलबजावणी करा...!
हजारो समाज बांधवांचा मोर्चात सहभाग

परभणी (Parbhani Reservation Marcha) : आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ घेण्यात यावा या मागणीसाठी सोमवार १५ जून रोजी मातंग समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आरक्षण आसूड मोर्चा काढण्यात आला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून निघालेल्या मोर्चात मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

अनुसूचित जाती आरक्षण (Parbhani Reservation Marcha) उपवर्गीकरण प्रारुप आरखडा ठरविण्यासाठी नेमलेल्या न्या. बदर समितीने राज्य शासनाला अहवाल सादर केला आहे. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यास विलंब होत आहे. काही ठराविक जातींनाच आरक्षणाचा लाभ मिळत होता. मात्र काही जाती या सर्व प्रक्रियेतून बाहेर फेकल्या जात होत्या. त्यांना संधी निर्माण करुन देण्यासाठी सरकारने विशेष तरतुद केली, अशी शिफारस १९६५ सालीच बी.एन. लोकुर समितीने केली होती. त्यानंतर न्या. बदर समितीने अहवाल सादर करुन उपवर्गीकरणाची शिफारस केली.

त्यामुळे शासनाने न्या. बदर समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करुन उपवर्गीकरणाचा निर्णय घेऊन राज्यात अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी आरक्षण आसूड मोर्चा (Parbhani Reservation Marcha) सोमवारी विविध मातंग संघटनांच्यावतीने जिल्हा कचेरीवर काढण्यात आला.  या मोर्चात कॉ. गणपत भीसे, के.के. भारसाकळे, रोहिदास नेटके, कुणाल गायकवाड, पप्पूराज शेळके, अरुण सोनवणे, दादाराव काळे, कोंडिबा जाधव, एल.डी. कदम, रेखा कांबळे आदीसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

संबंधित सामग्री

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

Parbhani Grain Theft: धान्य चोरीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासात उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी एका आंतरराज्यीय गुन्हेगाराला जेरबंद केले आहे..

Oct 07, 2026
परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

Parbhani Cannabis cultivation: तालुक्यातील कान्हा शेत शिवारात हळदीच्या पिकात बेकायदेशीरपणे केलेल्या गांजाच्या लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखा, बामणी पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला.

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

Parbhani Accused Arrested: पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेशाने स्थागुशा पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

Oct 02, 2026
परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

Parbhani Criminals Banished: जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दितील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातून  पाच व्यक्तींना हद्दपार करण्यात आले आहे.

Sep 29, 2026