महाराष्ट्र जलसंधारण दूत

जलसंधारण दूत म्हणून अशासकीय व निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करावी!

Water Conservation Ambassador:

जलसंधारण दूत म्हणून अशासकीय व निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करावी!

Water Conservation Ambassador

 

मंत्री ना. संजय यांच्याकडे समाज बांधवांचे साकडे!

मानोरा (Water Conservation Ambassador) : महाराष्ट्र शासनाने दिवंगत माजी मुख्यमंत्री तथा जलसंधारणाचे प्रणेते सुधाकरराव नाईक यांच्या २१ ऑगस्ट जयंतीदिनी  जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत करून वसंत -  विचारधारा मंचचे पदाधिकारी आणि समाज बांधवांनी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना. संजय यांची भेट घेऊन राज्यात मृद व जलसंधारण समितीमध्ये (Water Conservation Ambassador) सुधाकररावजी नाईक जलसंधारण अभियान अंतर्गत प्रत्येक जिल्हयात जिल्हा व तालुकास्तरीय समिती गठीत करून जलसंधारण दूत म्हणून अशासकीय सदस्य, निमंत्रित सदस्य म्हणून बंजारा समाजातील तरुणांची नियुक्ती करावी असे साकडे घातले. याबाबत मंत्री राठोड यांनी समाज बांधवांना आश्वासित केल्याची माहिती वसंत - विचारधारा मंचचे पदाधिकारी राजेश राठोड यांनी दिली आहे. 

 मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री ना. इंद्रनिल नाईक यांच्या अथक प्रयत्नाने व 'वसंत-विचारधारा मंच' च्या पाठपुराव्याने नुकतेच शासनाने दिवंगत माजी मुख्यमंत्री तथा जलसंधारणाचे प्रणेते सुधाकररावजी नाईक यांचे २१ ऑगस्ट जयंतीदिनी जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात बंजारा समाज बांधवांनी  काढण्यात आलेल्या शासन निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करून प्रत्येक जिल्ह्यातील बंजारा समाजातील तरुणांना जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय मृद व जलसंधारण समिती मध्ये "सुधाकररावजी नाईक जलसंधारण अभियान" अंतर्गत 'जलसंधारण दूत' म्हणून अशासकीय सदस्य, निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यासंदर्भात वसंत विचारधारा मंचचे पदाधिकारी व समाजबांधवांनी मंत्री ना. संजय राठोड यांची भेट घेऊन विनंती केली आहे. याप्रसंगी त्यांनी निवेदन स्वीकारून या संदर्भात आश्वासन दिले आहे. यावेळी वसंत विचारधारा मंचचे पदाधिकारी राजेश राठोड, स्वीय सहाय्यक गौरव पवार यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.