जलसंधारण अभियान

जलसंधारण अभियान राबवून माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या स्मृतींना देण्यात येणार उजाळा! 

Water Conservation Campaign: महाराष्ट्राला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न पाहणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ राज्य शासनाकडून यंदा जलसंधारण

जलसंधारण अभियान राबवून माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या स्मृतींना देण्यात येणार उजाळा! 

Water Conservation Campaign

 

तरुणांना एक लाख रिल्स बनविण्याचे शासनाचे आवाहन! 

मानोरा (Water Conservation Campaign) : महाराष्ट्राला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न पाहणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ राज्य शासनाकडून यंदा जलसंधारण सप्ताह मोठ्या प्रमाणात राबविला जाणार आहे.  नाईक यांनी मुख्यमंत्री असताना राज्यात "पाणी अडवा, पाणी जिरवा" या मंत्रावर भर देत पाणलोट क्षेत्र विकास, भूजल पुनर्भरण आणि मृद व जलसंधारणाच्या कामांना गती दिली होती. शेती, पर्यावरण आणि शाश्वत विकासाचा पाया असलेल्या जलसंधारणाच्या कार्याला उजाळा देण्यासाठीच त्यांच्या नावाने हे अभियान राबविले जात आहे. 

राज्य शासनाने १५ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट या कालावधीत "जलसंधारण सप्ताह" घोषित केला आहे. यावेळी राज्यभर गावोगावी पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवू या उपक्रमांतर्गत विविध कामे केली जातील.  विशेष म्हणजे २१ ऑगस्ट हा दिवस सुधाकरराव नाईक यांचा जन्मदिवस असल्याने तो "राज्य जलसंधारण दिन" म्हणून साजरा केला जाणार आहे. या अभियानात तरुणांचा सहभाग वाढविण्यासाठी सरकारने विशेष उपक्रम हाती घेतला आहे. जलसंधारणाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामांची माहिती देणाऱ्या एक लाख 'रिल्स' बनवून सोशल मीडियावर प्रसारित करण्याचे आवाहन तरुणांना करण्यात आले आहे. 

 २१ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये 'महा वॉकिथॉन - वॉक फॉर वॉटर' चे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात किमान १० ते १५ हजार नागरिक सहभागी होतील, असा अंदाज आहे. सुधाकरराव नाईक यांनी आपल्या कार्यकाळात मृद व जलसंधारणाला प्राधान्य देत राज्यातील कोरडवाहू भागाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पिकांची उत्पादकता वाढवणे आणि भविष्यातील पिढीसाठी जलस्रोतांचे रक्षण करणे हेच त्यांच्या धोरणाचे केंद्रबिंदू होते.  त्यांच्या या दूरदृष्टीच्या कार्याला सलाम म्हणूनच शासनाने जलसंधारणाला त्यांच्या नावाची जोड दिली आहे.  राज्याचे मृद व जलसंधारण विभागाने यासंदर्भातील आदेश काढले असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना १५ ते २१ ऑगस्ट दरम्यान विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

संबंधित सामग्री

सुधाकररावजी नाईक जलसंधारण अभियानद्वारे विविध कार्यक्रम व उपक्रम राज्यभरात राबवावे! 

सुधाकररावजी नाईक जलसंधारण अभियानद्वारे विविध कार्यक्रम व उपक्रम राज्यभरात राबवावे! 

Water Conservation Campaign: महाराष्ट्र शासनाने नुकताच माजी मुख्यमंत्री तथा 'जलसंधारणाचे प्रणेते' सुधाकररावजी नाईक साहेब यांचा २१ ऑगस्ट हा जयंतीदिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय

Aug 04, 2026