मानव-वन्यजीव संघर्ष

मानव-वन्यजीव संघर्षातील माकडे पकडण्यासाठी आता 600 रुपये दर निश्चित

Human-Wildlife Conflict: राज्यातील मानव-वन्यजीव संघर्षग्रस्त भागातील माकडे व वानरे पकडण्यासाठी नवीन दर 600 रुपये निश्चित केले गेले आहेत. यामुळे बचाव कार्याला गती मिळण्याची अपेक्षा आहे.

मानव-वन्यजीव संघर्षातील माकडे पकडण्यासाठी आता 600 रुपये दर निश्चित

Human-Wildlife Conflict

जवळा बाजार (Human-Wildlife Conflict) : राज्यातील मानव-वन्यजीव संघर्षग्रस्त भागातील माकडे (Rhesus Macaque) व वानरे (Semnopithecus entellus) यांना सुरक्षित पकडून अधिवासात सोडण्यासाठी शासनाने नवीन दर निश्चित केले आहेत. महसूल व वन विभागाने 22 एप्रिल 2026 रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी केला. या निर्णयानुसार, संघर्षग्रस्त माकड/वानर पकडून सुरक्षितपणे अधिवासात सोडल्यास प्रति माकड 600 रुपये दर अदा करण्यात येणार आहे. यापूर्वी 25 नोव्हेंबर 2025 च्या शासन निर्णयाने यासाठी कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली होती. मात्र लोकप्रतिनिधींकडून आर्थिक मापदंडात सुधारणा करण्याची मागणी वारंवार होत होती.

9 डिसेंबर 2025 रोजी वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतही दरवाढीचा मुद्दा चर्चेला आला होता. त्यानंतर शासनाने या मागणीचा विचार करून दरात सुधारणा केली आहे. नवीन दर शासन निर्णयाच्या दिनांकापासून म्हणजेच 22 एप्रिल 2026 पासून लागू झाले आहेत.

शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे की, पूर्वीच्या 25 नोव्हेंबर 2025 च्या निर्णयातील इतर सर्व तरतुदी कायम राहतील. केवळ माकडे पकडून सोडण्याच्या दरात बदल करण्यात आला आहे. हा (Human-Wildlife Conflict) आदेश विशेष कार्य अधिकारी उदय चंद्रकांत ढगे यांच्या डिजिटल स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे. राज्यातील वाढत्या मानव-वानर संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या या निर्णयामुळे बचाव कार्याला गती मिळण्याची अपेक्षा आहे.

संबंधित सामग्री

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026