मानोरा बंजारा समाज

पाणी बंद व वैद्यकीय उपचार न घेण्याचा आंदोलनकर्त्यांचा कठोर निर्णय; शासनाने तातडीने दखल घ्यावी

Manora Banjara Samaj: बंजारा समाजाची काशी तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथे १३ सप्टेंबरपासून सुरू असलेल्या सामूहिक आमरण उपोषणाच्या सहाव्या दिवशीही शासन - प्रशासनाकडून ठोस दखल न घेतल्याने उपोषणकर्त्या

पाणी बंद व वैद्यकीय उपचार न घेण्याचा आंदोलनकर्त्यांचा कठोर निर्णय; शासनाने तातडीने दखल घ्यावी

Manora Banjara Samaj

 

आंदोलनाच्या ६ व्या दिवशीही शासन व प्रशासन गप्पच
सरकारने अंत पाहून नये, राज्यभर आंदोलनाची धग पेटविण्याचा इशारा
पालकमंत्र्यांनी आंदोलन स्थळाला भेट द्यावी

मानोरा (Manora Banjara Samaj) : बंजारा समाजाची काशी तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथे १३ सप्टेंबरपासून सुरू असलेल्या सामूहिक आमरण उपोषणाच्या सहाव्या दिवशीही शासन - प्रशासनाकडून ठोस दखल न घेतल्याने उपोषणकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. पाचव्या दिवसापासून आरोग्य तपासणी व  पाणी पीण्याचाही बंद करण्याचा कठोर निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले असल्याने आंदोलनाची धग पेटली आहे.  १९ व २० सप्टेंबर रोजी दोन दिवस वाशिम जिल्हा दौऱ्यावर १९ व २० सप्टेंबर रोजी कृषिमंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आगमन होत आहे. तेंव्हा त्यांनी उपोषणस्थळाला भेट देऊन शासनाची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी गोर बंजारा समाज बांधवाकडून होत आहे. 

निसर्ग पूजक बंजारा समाज (Manora Banjara Samaj) संपूर्ण भारत देशात एकच धर्म, बोलीभाषा, पेहराव, परंपरा, संस्कृती, परंपरा असताना वेगवेगळ्या राज्यात शासनाने वेगवेगळ्या सुचित समाविष्ट केले आहे. या मागणीसाठी दिवंगत धर्मगुरु संत डॉ रामराव महाराजांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेऊन संपूर्ण भारत देशात बंजारा समाजाला आंध्रप्रदेश, तेलंगाप्रमाणे आरक्षण देण्यासाठी आग्रही, मागणी केली होती. त्यावेळी पंतप्रधान महोदयांनी आश्वासन सुध्दा दिले होते.

त्या आश्वासनाची आठवण देत बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार गोर बंजारा समाजाला एस.टी. प्रवर्गात समावेश आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सतिष पवार यांच्यासह इतर ७ युवकांनी तीर्थक्षेत्र पोहरादेवीत बेमुदत सामुहिक आंदोलन लोकशाही मार्गाने शांततेत सुरू आहे.  त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुध्दा समाजाच्या शिष्टमंडळाला एसटी आरक्षण संदर्भात बैठक घेऊन न्यायाधीश तहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. मात्र त्याचा अहवाल अद्यापही सार्वजनिक करण्यात आलेला नाही. त्यामुळे या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने बंजारा समाज न्यायासाठी आक्रमक झाला आहे. त्यासाठी शासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने उपोषणस्थळी शासनाचा अधिकृत प्रतिनिधी पाठवावा, उपोषणकर्त्यांशी चर्चा करावी आणि मागणीवर स्पष्ट व ठोस भूमिका मांडावी.

“व्यक्तीपेक्षा समाज मोठा, श्रेयापेक्षा समाजाची एकजूट मोठी” या भावनेने सुरू असलेल्या या आंदोलनाची शासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे. कृषिमंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे १९ व २० सप्टेंबर रोजी वाशिम जिल्हयाच्या दौऱ्यावर असुन तीर्थक्षेत्र संतनगरी पोहरादेवी असलेल्या मानोरा तालुक्यात त्यांचा पिक पाहणीचा दौरा आहे. त्यांनी आंदोलन घटनास्थळी भेट देऊन शासनाची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी समाजबांधवांच्या वतीने करण्यात आली आहे. 

टैग्स: Manora Banjara Samaj