मानोरा तहसील उपोषण

विविध मागण्यांसंदर्भात तहसील कचेरीवर उपोषणाला प्रारंभ

Manora Tehsil Uposhan: मानोरा येथे धीरज राठोड यांनी अवैध अतिक्रमण व इतर मागण्यांसाठी तहसील कचेरीवर आमरण उपोषण सुरु केले. अनेक सामाजिक कार्यकर्ते उपोषणाला पाठिंबा देत आहेत.

विविध मागण्यांसंदर्भात तहसील कचेरीवर उपोषणाला प्रारंभ

Manora Tehsil Uposhan

मानोरा (Manora Tehsil Uposhan) : तहसिल परिसरातील अवैध अतिक्रमण हटविण्यासह विविध मागण्या संदर्भात दि. १६ एप्रिल पासून धीरज राठोड महाराजांनी (Manora Tehsil Uposhan) आमरण उपोषण आंदोलनाला सुरुवात केली आहे. तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, तहसिल समोरील वयेंडर कक्ष ही शासकीय इमारत असुन यामध्ये मान्यता प्राप्त वायेंडर बसत नाहीत. या इमारतीत एजंट म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींना विद्युत मिटर दिले आहे.

या एजंट यांना तहसील विभागाने नाहरकत कोणत्या नियमाने दिले. त्यामुळे तात्काळ  याबाबतची चौकशी होऊन कार्यवाही व्हावी, तसेच विना परवाना धारकांना बसण्यास प्रतिबंध करावे, तहसिल परिसरातील गट क्रमांक ७८ मधील सर्वत्र अतिक्रमण हटवावे, या मागण्या संदर्भात वारंवार विनंती निवेदने देऊनही कार्यवाही होत नसल्याने आंदोलन कर्ता धीरज राठोड महाराज यांनी तहसिल कचेरीवर आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे. (Manora Tehsil Uposhan) उपोषणाच्या पहिल्या दिवशी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनाला भेट देऊन पाठींबा दिला आहे.

संबंधित सामग्री

वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

मानोऱ्यात वैद्यकीय विद्यार्थ्याला बोलेरो पिकअपची धडक; तक्रार आणि CCTV पुरावा असूनही वाहन ताब्यात न घेतल्याचा आरोप.

Oct 03, 2026
आखाडा बाळापूर अप्पर तहसील कार्यालयासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला मोठा प्रतिसाद 

आखाडा बाळापूर अप्पर तहसील कार्यालयासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला मोठा प्रतिसाद 

Tehsildar office Hunger strike: आखाडा बाळापूर तालुका निर्मिती अप्पर तालुका घोषित करा या मागणीसाठी २ आक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आखाडा बाळापूर तालुका कृती समितीच्या वती

Oct 02, 2026
दुष्काळ जाहीर; मदतीचा मात्र 'कोरडा' जीआर! 

दुष्काळ जाहीर; मदतीचा मात्र 'कोरडा' जीआर! 

Manora Drought declared: गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात असताना शासनाने काढलेला दुष्काळी शासन निर्णय 'कोरड्या दुष्काळाचा कोरडा जीआर' आहे. दुष्काळी उपाययोजना

Sep 28, 2026
तहसील कार्यालयासह सरकारी कचेऱ्या झाल्या भटक्या कुत्र्यांचे विश्रांती गृह!

तहसील कार्यालयासह सरकारी कचेऱ्या झाल्या भटक्या कुत्र्यांचे विश्रांती गृह!

Manora Tehsil Office: मानोरा शहरातील गजबजलेल्या शासकीय कार्यालयांमध्ये सध्या अधिकारी, कर्मचाऱ्यांपेक्षा भटक्या श्वानांचा मुक्त वावर वाढला असून, कामकाजाच्या वेळेतच या कुत्र्यांनी सरकारी कार्यालयात..

Sep 27, 2026
बुलढाणा–काशी पोहरादेवी बससेवा सुरू

बुलढाणा–काशी पोहरादेवी बससेवा सुरू

बुलढाणा–काशी पोहरादेवी मुक्काम एसटी बससेवा २५ सप्टेंबरपासून सुरू; भाविकांना दिलासा. पोहरादेवीत एसटी डेपो उभारण्याची मागणी.

Sep 26, 2026