मानोरा तालुका कोरडा

मानोरा तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांची तहसील कचेरीवर धडक

Manora Taluka Dry: तालुक्यात निर्माण झालेली शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत भयावह आणि चिंताजनक आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे.

मानोरा तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांची तहसील कचेरीवर धडक

Manora Taluka Dry

मानोरा (Manora Taluka Dry) : तालुक्यात निर्माण झालेली शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत भयावह आणि चिंताजनक आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर मानोरा तालुका दुष्काळग्रस्त (Manora Taluka Dry) घोषित करून तातडीने दुष्काळाचे सर्वेक्षण सुरू करावे, तसेच शेतकऱ्यांना आवश्यक ती शासकीय मदत व उपाययोजना त्वरित उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी दि. ७  सप्टेंबर रोजी फुलउमरी सर्कल मधील शेतकऱ्यांनी प. स. चे माजी सदस्य अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना निवेदन दिले.

मानोरा तालुक्यात मागील ४० दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. पावसाअभावी शेतातील सोयाबीन कापूस तुर यासह सर्वच पिके कोमेजून मरत आहेत. आतापासूनच जनावर चारा, पाणी टंचाई समस्या उद्भवत आहे. त्यामुळे तात्काळ दुष्काळ घोषीत करून दुष्काळाच्या सवलती द्याव्यात असे निवेदन दिले आहे. निवेदन देतेवेळी फुलउमरी सर्कल मधील गावागावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून निवेदन सादर केले. (Manora Taluka Dry) याप्रसंगी शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती लक्षात घेता शासनाने याची तातडीने दखल घेऊन (Manora Taluka Dry) मानोरा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा आणि शेतकऱ्यांना त्वरित दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली.

टैग्स: Manora Taluka Dry