कुरूंदा (Maratha reservation Suicide Case) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलनाचा प्रवाह सुरू असतानाच वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे एका युवकाने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना १९ सप्टेंबर रोजी उघडकीस आली असून या प्रकरणी शनिवारी कुरुंदा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुरुंदा येथील रहिवासी जगदीश बापूराव दळवी हे मागील अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रचंड विवंचनेत होते. (Maratha reservation Suicide Case) मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी यापूर्वी झालेल्या विविध टप्प्यातील आंदोलनांमध्ये त्यांनी अतिशय सक्रिय सहभाग नोंदविला होता. समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर ते नेहमीच आग्रही असायचे. त्यातच यंदाच्या हंगामात पावसाने मोठी दडी मारल्याने वसमत तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेती पिके हातची गेल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा, या चिंतेने ते अधिकच हतबल झाले होते.
या दुहेरी विवंचनेतून त्यांनी १८ सप्टेंबर रोजी कुरुंदा परिसरातून वाहणार्या जलेश्वर नदी परिसरात जाऊन विजेची तार पकडत आपले जीवन संपविले. (Maratha reservation Suicide) Case घटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या घटनेमुळे कुरुंदा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मयत जगदीश बापूराव दळवी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा दळवी परिवार आहे. कुरुंदा पोलीस पुढील तपास करीत आहेत.
मराठा आरक्षण आत्महत्या
मराठा आरक्षणासाठी युवकाचे टोकाचे पाऊल; विजेची तार पकडून संपविली जीवनयात्रा
Maratha reservation Suicide Case: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलनाचा प्रवाह सुरू असतानाच वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे एका युवकाने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपविल्याची धक्कादायक घटना
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Maratha reservation Suicide Case