लातूर मतदान

स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ निवडणूक; लातूर वगळता सर्वत्र शंभर टक्के मतदान!

Latur Election: लातूर, धाराशिव व बीड मधील मतदाता संघात 18व्या दिवशी शंभर टक्के मतदान झाले. भाजपा महायतीचा उमेदवार बसवराज पाटीलचा विजय असण्याचा विश्वास सतत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ निवडणूक; लातूर वगळता सर्वत्र शंभर टक्के मतदान!

Latur Election

लातूर (Latur Election) : लातूर धाराशिव बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात गुरुवारी (दि.18) लातूर मतदान केंद्र वगळता इतर सर्व मतदान केंद्रांवर शंभर टक्के मतदान झाले. सरासरी मतदान 99.49 टक्के इतके झाले. भाजपा महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील व काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांच्यात या निवडणुकीसाठी प्रमुख लढत होत आहे. दरम्यान या निवडणुकीत भाजपा महायुतीचा विजय निश्चित होईल, असा विश्वास भाजपा महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांनी व्यक्त केला. 

लातूर धाराशिव बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात भाजपा महायुतीचे उमेदवारी बसवराज पाटील यांना तर काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांना देण्यात आली. जवळपास पंधरा दिवस प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. लातूर धाराशिव बीड या तिन्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्य हे या निवडणुकीतील मतदार आहेत. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यात जिल्हा परिषदेची निवडणूक झाली नसल्याने तेथे जिल्हा परिषद सदस्य मतदार नाहीत.

शनिवारी या (Latur Election) निवडणुकीसाठी जवळपास 29 मतदान केंद्रावर मतदान झाले. बीड जिल्ह्यात 11, धाराशिव जिल्ह्यात 8 तर लातूर जिल्ह्यात 10 मतदान केंद्रावर मतदान झाले. लातूर जिल्ह्यातील लातूर येथील मतदान केंद्रावर तीन पुरुष मतदारांनी व दोन महिला मतदारांनी अशा एकूण पाच मतदारांनी मतदान केले नाही. 88 पैकी केवळ 83 मतदान झाले. टक्केवारी 94.32 इतके मतदान लातूर केंद्रावर नोंदले गेले. उर्वरित सर्व मतदान केंद्रावर शंभर टक्के मतदान झाले. सरासरी मतदान 99.49 टक्के इतके झाले.

प्रचारातही बसवराज पाटलांची आघाडी 
लातूर-धाराशिव-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात भाजपा व महायुतीचा एकतर्फी विजय निश्चित होता, मात्र काँग्रेस व महाआघाडीने महेश देशमुख यांना उमेदवारी दिल्याने या मतदारसंघात लढत झाली. मात्र बसवराज पाटील यांनी सुरुवातीपासूनच प्रचाराची रणधुमाळी कायम ठेवली. मतदान केंद्र असलेल्या प्रत्येक गावात जाऊन त्यांनी भाजपा व महायुतीच्या नेत्यांची व मतदारांची प्रत्यक्ष भेट घेत संवाद साधला. त्यांच्या प्रचारासाठी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांपासून अनेक मंत्री, आमदार यांनी मैदान सोडले नाही. या उलट काँग्रेस महाआघाडी उमेदवाराच्या प्रचाराची सुरुवात माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी केली आणि प्रचाराची संपूर्ण धुरा उमेदवार महेश देशमुख यांनी त्याच्या स्थानिक महाआघाडीच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन सांभाळली. मतदार संघात भाजपा व महायुतीचे संख्याबळ पाहता भाजपा महायुतीचा विजय निश्चित मानला जात आहे.

संबंधित सामग्री

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
लैंगिक अत्याचारप्रकरणी २० वर्षे सश्रम कारावास!

लैंगिक अत्याचारप्रकरणी २० वर्षे सश्रम कारावास!

Latur Sexual Assault Case: नागझरी येथे आरोपीने १२ वर्षीय मुलीच्या भोळसर स्वभावाचा गैरफायदा घेत तिला लातूर शहर फिरवून आणण्याचे सांगितले. त्यानंतर तिला दुचाकीवरून पुणे

Oct 02, 2026
नांदेड उप महानिरीक्षकांच्या पथकाने घातले, लातूर पोलिसांच्या डोळ्यात झणझणीत अंजन 

नांदेड उप महानिरीक्षकांच्या पथकाने घातले, लातूर पोलिसांच्या डोळ्यात झणझणीत अंजन 

Latur Matka-Gambling Raid: लातूरचे पोलीस हेल्मेट सक्तीच्या कामगिरीत गुंतले असताना दुसरीकडे नांदेडच्या पोलीस उप महानिरीक्षकांच्या पथकाने लातूर शहर जिल्ह्यात राजरोस चालणाऱ्या मटका व जुगारांवर धाड..

Oct 01, 2026
हेल्मेट सक्तीमुळे अपघाती मृत्युसंख्येत घट

हेल्मेट सक्तीमुळे अपघाती मृत्युसंख्येत घट

Latur Helmet Rule Mandatory: गेल्या महिनाभरात झालेल्या अपघाती मृत्यूच्या आकडेवारीतून लातूर पोलिसांच्या हेल्मेट सक्तीचा सकारात्मक परिणाम झाल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला. ऑगस्ट मधील ३३ अपघाती मृत्यू

Oct 01, 2026
दुहेरी खून प्रकरणात पाच जणांना जन्मठेप! 

दुहेरी खून प्रकरणात पाच जणांना जन्मठेप! 

Latur Double Murder Case: डांगेवाडी येथे पाणंद रस्त्याच्या वादातून झालेल्या दुहेरी खून प्रकरणात पाच आरोपींना निलंगा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने 29 सप्टेंबर 2026 रोजी जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावल

Sep 30, 2026