कन्हान-पिपरी नगरपरिषद

कन्हान-सिहोरा येथील आरक्षित जागा कायम ठेवण्यात यावी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा

Kanhan-Pipri Municipal Council: नगरपरिषद कन्हान-पिपरी हद्दीतील मौजा कन्हान-सिहोरा येथील सर्वे क्रमांक १०२, १०३ व १०४ मधील आरक्षित जागांचे आरक्षण कायम ठेवावे तसेच नगरपरिषदच्या मासिक सभेतील ठराव क्रमांक

कन्हान-सिहोरा येथील आरक्षित जागा कायम ठेवण्यात यावी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा

Kanhan-Pipri Municipal Council

कन्हान (Kanhan-Pipri Municipal Council) : नगरपरिषद कन्हान-पिपरी हद्दीतील मौजा कन्हान-सिहोरा येथील सर्वे क्रमांक १०२, १०३ व १०४ मधील आरक्षित जागांचे आरक्षण कायम ठेवावे तसेच नगरपरिषदच्या मासिक सभेतील ठराव क्रमांक १६ रद्द करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मसार सह काँग्रेसचे नगरसेवक यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
               
निवेदनानुसार, संबंधित आरक्षित जागा प्राथ मिक शाळा, स्टेडियम आदी सार्वजनिक सुविधांसाठी राखीव असुन त्यांचे आरक्षण रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या जागांच्या विकासासाठी मंजुर झालेला निधी त्याच उद्देशासाठी वापरण्यात यावा, अशीही मागणी करण्या त आली आहे. (Kanhan-Pipri Municipal Council) प्रशासनाने या मागणीवर तातडीने सका रात्मक निर्णय घेऊन आरक्षण कायम ठेवावे.

तसेच २ जुलै २०२६ रोजी झालेल्या नगरपरिषद मासिक सभे तील ठराव क्रमांक १६ रद्द करावा, अन्यथा नागरिकां च्या वतीने भव्य जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बाजीराव मसार सह कॉग्रेसचे नगरसेवक यांनी दिला आहे. निवेदन देता ना सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बाजीराव मसार, कॉग्रे सचे नगरसेवक समशेर पुरवले, नगरसेविका नीती तेलोते तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.