आरमोरी तालुका समस्या

तालुक्यात समस्यांचे डोंगर, स्थानिक लोकप्रतिनिधी राजकीय ‘दौऱ्या’त मग्न! 

Armori Taluka problem: आरमोरीच्या गावात पाण्याच्या संकट आणि शेतकऱ्यांना वनपट्टेचा लाभ मिळण्यासाठी शासकीय अडचणी असली. कर्जबाजार, धान खरेदी व रोजगारीच्या कमतरत्या

तालुक्यात समस्यांचे डोंगर, स्थानिक लोकप्रतिनिधी राजकीय ‘दौऱ्या’त मग्न! 

Armori Taluka problem

स्थानिक समस्याकडे दुर्लक्ष: जनतेच्या विकासाचे काय?
भाजयुमो तालुकाध्यक्ष विनोद कोरेटी यांचे स्थानिक लोकप्रतिनिधींना सवाल!
पायाभूत सुविधांचा अभाव

आरमोरी (Armori Taluka problem) : आरमोरी, देसाईगंज, धानोरा व कोरची परिसरातील अनेक ग्रामीण भागातील गावांमध्ये आजही पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. दुरुस्तीविना रस्ते खड्डेमय झाले आहेत काही गावात जाण्यासाठी पक्क्या रस्त्याने जोडले गेलेच नाही. मंजूर झालेल्या कामाचे आमदार व खासदार यांनी निधी आणण्यास असमर्थ असल्याकारणाने तालुक्याविकासात अजून दहा वर्षे मागे..

शेतीचे प्रश्न: कोटगुल परिसरातील वनपट्टेधारक शेतकरी हेक्टरी  बोनस व प्रोत्साहन राशीपासून वंचितआहेत. वनपट्टेधारक शेतकऱ्यांचे शासकीय धान खरेदी केंद्रातील सचिवाने आंतरजालावर नोंदणी न केल्यामुळे वनपट्टेधारक शेतकरी धान विकू शकले नाहीत. त्यामुळे आज ते कर्जबाजारी आहेत, तसेच अतिक्रमणधारक शेतकरी ज्यांना अजून पर्यंत वनपट्टे मिळालेले नाही असे शेतकरी एरणीवर आहेत या प्रश्नाकडे दुर्लक्ष!

शासकीय धान खरेदी केंद्र समोर पीकअपने विक्रीसाठी रब्बीचे  धान आणून सुद्धा एकही कर्मचारी उपस्थित नाही. शेतकऱ्यांना तासोनातास वाट पाहावी लागत आहे. धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची होणारी अडवणूक यावर लोकप्रतिनिधींनी संसदेत किंवा विधिमंडळात कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. 
 
रोजगार आणि आरोग्य: तरुणांच्या हाताला काम नाही आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये औषधोपचार व डॉक्टरांची कमतरता कायम आहे. केवळ राजकीय दौरे आणि जनसंपर्क :स्थानिक विकास कामांना निधी मिळवून देण्याऐवजी आमदार महोदय पक्षाच्या राजकीय सभा, पदयात्रा आणि उद्घाटन समारंभांमध्येच अधिक व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे मतदारांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. भाजयुमो कोरची चे तालुकाध्यक्ष विनोद कोरेटी यांनी आरोप केले आहे.

संबंधित सामग्री

कर्जमुक्ती यादीतील रक्कम आणि बँक भरणार त्या रक्कमेच्या याद्या प्रकाशीत करून शेतकऱ्यांचा संभ्रम दूर करा: विनायक सरनाईक

कर्जमुक्ती यादीतील रक्कम आणि बँक भरणार त्या रक्कमेच्या याद्या प्रकाशीत करून शेतकऱ्यांचा संभ्रम दूर करा: विनायक सरनाईक

Farmer Loan Waiver List: राज्य शासनाने जाहीर केलेल्या 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत मोठा गोंधळ आणि संभ्रम निर्माण झाला आहे. शासनाच्या यादीतील माफीची रक्कम, बँकेच्या नोंदी

Aug 02, 2026
बियाणे तक्रारींचे तातडीने निवारण करुन दोषी विक्रेत्यांवर कठोर कारवाई करा

बियाणे तक्रारींचे तातडीने निवारण करुन दोषी विक्रेत्यांवर कठोर कारवाई करा

Collector Rahul Gupta: बियाणे जिल्ह्यातील बियाणे कंपन्यांना बोगस बियाणे विक्रित करण्यासाठी कठोर काळ्याशी युक्त करून, शेतकऱ्यांच्या तक्रारांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश

Jul 27, 2026
कर्जमाफीतील योजनेतील जाचक अटी रद्द करून; शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी

कर्जमाफीतील योजनेतील जाचक अटी रद्द करून; शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी

Farm Loan Waiver Scheme: कर्जमाफी योजना मध्ये जाचक अटीच्या कारणाने शेतकर्यांना लाभासाठी संघर्ष होत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना त्वरित रद्द करण्याचा मागा केला.

Jun 16, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिक विमा प्रश्नावर महसूल मंत्र्यांचे कृषी मंत्रीना कारवाईचे पत्र 

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिक विमा प्रश्नावर महसूल मंत्र्यांचे कृषी मंत्रीना कारवाईचे पत्र 

Farmers Crop Insurance: नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन यांचे पिक विमा नुकसान भरपाई मिळत नसल्यामुळे तात्काळ कारवाई मागितली गेली. परिवर्तन शेतकरी संघटन

May 26, 2026
अकरा वर्षापासून न्याय मिळत नसल्याने भूमी अभिलेख कार्यालयासमोर शेतकऱ्याची आत्मदहनाची तयारी

अकरा वर्षापासून न्याय मिळत नसल्याने भूमी अभिलेख कार्यालयासमोर शेतकऱ्याची आत्मदहनाची तयारी

Land Records Office: वसमत येथील भूमी अभिलेख कार्यालयातील अडवणूकामुळे शेतकरी मारोतराव गंगाराम फेगडे यांनी १२ वर्षांपेक्षा जास्त काळाने दलित झाल्याने आत्मदहन

May 25, 2026