परभणी इसम मृत्यू

परभणीत गोदावरी नदी पात्रात बुडून ५० वर्षीय इसमाचा मृत्यू

Parbhani Man Death: गोदावरी नदीपात्रात आंघोळीसाठी गेल्यासमवेत ५० वर्षीय सुरेश तुळशीराम रासवे यांचा पाण्यात बुडून दिव्यांधलेला मृत्यू शनिवार झाला. त्यांचा शोध करूने आलेल्या सहकारी युवक

परभणीत गोदावरी नदी पात्रात बुडून ५० वर्षीय इसमाचा मृत्यू

Parbhani Man Death

 

मानवत तालुक्यातील रामपुरी येथील घटना मयत परळी तालुक्यातील रहिवाशी

परभणी (Parbhani Man Death) : मानवत  तालुक्यातील रामपुरी बु. येथील गोदावरी नदीपात्रात अंघोळीसाठी गेलेल्या ५० वर्षीय इसमाचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना शनिवार २० जून रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली सुरेश तुळशीराम रासवे असे मयत व्यक्तीचे नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बिड जिल्यातील परळी तालुक्यातील गोवर्धन हिवरा येथील सुरेश तुळशीराम रासवे हे आपल्या कुटुंबासह आपली सासू सुमन जनार्दन काळे रा. रामेटाकळी ता.मानवत जि.परभणी यांच्या दहाव्याच्या कार्यक्रमासाठी शनिवार २० जून रोजी सकाळी रामपुरी बु.येथील घाटावर आले होते. यावेळी सुरेश रासवे हे आंघोळीसाठी  गोदावरी नदीपात्रात उतरले परंतु त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाय घसरून पाण्यात बुडाले पुन्हा ते वर आलेच नाही.

रामपुरी येथील युवकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही. त्यानंतर मानवत, पाथरी येथील अग्निशमन दलाच्या गाड्या व एनडीआरएफची टीम यांच्यासह रामपुरी येथील ग्रामस्थ व युवकांनी शोध मोहीम सुरू केली. घटनेची माहिती मिळताच बीट जमादार सिद्धेश्वर पाळोदे, बंकट लटपटे, शफीक शेख, उत्तम धबडगे, प्रल्हाद दुधाटे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दुपारी चारच्या सुमारास त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात काढून रामपुरी बु.येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी देण्यात आला. सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावयाचा गोदावरीच्या पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित सामग्री

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

Parbhani Grain Theft: धान्य चोरीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासात उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी एका आंतरराज्यीय गुन्हेगाराला जेरबंद केले आहे..

Oct 07, 2026
परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

Parbhani Cannabis cultivation: तालुक्यातील कान्हा शेत शिवारात हळदीच्या पिकात बेकायदेशीरपणे केलेल्या गांजाच्या लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखा, बामणी पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला.

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

Parbhani Accused Arrested: पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेशाने स्थागुशा पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

Oct 02, 2026
परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

Parbhani Criminals Banished: जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दितील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातून  पाच व्यक्तींना हद्दपार करण्यात आले आहे.

Sep 29, 2026