मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण

Marathwada Liberation Day: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार, दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी हिंगोली जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले

पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण

Marathwada Liberation Day

 

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त १७ सप्टेंबर रोजी हिंगोलीत विविध कार्यक्रम

हिंगोली (Marathwada Liberation Day) :  मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार, दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी हिंगोली जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या निमित्ताने सकाळी ८.४० वाजता नांदेड रोड, हिंगोली येथील मराठवाडा मुक्ती संग्राम स्मृतिस्तंभ, स्वातंत्र्यसैनिक अण्णाराव टाकळगव्हाणकर बाल उद्यान येथे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी सीताराम झिरवाळ यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ९.०० वाजता ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणार्‍या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

संबंधित सामग्री

पालकमंत्री म्हणाले, पाऊस अतिशय कमी; जिल्ह्यात खरीप पिकांचे मोठे नुकसान! 

पालकमंत्री म्हणाले, पाऊस अतिशय कमी; जिल्ह्यात खरीप पिकांचे मोठे नुकसान! 

Marathwada Liberation Day: यंदा एल-निनोमुळे जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी राहिले आहे. त्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीची राज्य शासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे

Sep 17, 2026
मुक्तिसंग्रामाचा जाज्वल्य इतिहास नव्या पिढीसाठी प्रेरणादायी

मुक्तिसंग्रामाचा जाज्वल्य इतिहास नव्या पिढीसाठी प्रेरणादायी

Marathwada Liberation Day: मराठवाड्याच्या मुक्तीसाठी संघर्ष करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे आणि बलिदानाचे स्मरण करीत स्व. माणिक पोदार लर्न स्कूल, वाढोणा येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

Sep 17, 2026
जरांगेंच्या मागण्यांवर फडणवीसांचे भाष्य; १३ पैकी १२ मागण्या मान्य, एका मागणीसमोर कायदेशीर अडचण

जरांगेंच्या मागण्यांवर फडणवीसांचे भाष्य; १३ पैकी १२ मागण्या मान्य, एका मागणीसमोर कायदेशीर अडचण

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी फडणवीसांनी जरांगेंच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य असल्याचे सांगितले. दुष्काळ, शेतकरी आणि मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावरही त्यांनी भाष्य केले.

Sep 17, 2026