राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण

शहरी आरोग्य केंद्र मस्तान नगर येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीमचे उद्घाटन

Pulse Polio Immunization: जिल्हापरिषदेच्या नेत्यांनी मस्‍तान नगरातील आरोग्य केंद्राच्या समावेशाने राष्ट्रिय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात जिल्हा कडून अनेक अधिकारी उपस्थित

शहरी आरोग्य केंद्र मस्तान नगर येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीमचे उद्घाटन

Pulse Polio Immunization

हिंगोली (Pulse Polio Immunization) : आज २८ जून रोजी शहरातील आरोग्य केंद्र मस्तानशहा नगर येथे बालकांना पोलिओचा डोस पाजून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड  व नगराध्यक्षा सौ रेखाताई श्रीराम बांगर यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी गटनेते श्रीराम बांगर, नगरसेवक, सुनीता गणेश बांगर, निधी गोरे, सुरभी चोधरी, रत्नाकर बांगर, सुमित कांबळे, उपसंचालिका डॉ. बबिता कमलाकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र पुरी, डॉ.गोपाल कदम, वैद्यकीय अधिकारी डॉ संतोष गिरी यांच्यासह आरोग्य केंद्राचे  कर्मचारी उपस्थित होते.