मयुर बोर्डे

मयुर बोर्डे यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा प्रदेशाध्यक्षपदी निवड

Mayur Borde:

मयुर बोर्डे यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा प्रदेशाध्यक्षपदी निवड

Mayur Borde

पुणे (Mayur Borde) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा प्रदेशाध्यक्षपदी मयुर बोर्डे (Mayur Borde) यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि युवकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करणाऱ्या मयुर बोर्डे यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शेतकरी, कष्टकरी आणि ग्रामीण भागातील युवकांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठविण्यासोबतच संघटनेची भूमिका तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी मयुर बोर्डे यांनी यापूर्वी सक्रियपणे काम केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत संघटनेच्या युवा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर बोलताना मयुर बोर्डे (Mayur Borde) म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि ग्रामीण युवकांच्या भविष्यासाठी प्रामाणिकपणे आणि आक्रमकपणे काम करणार आहे. संघटनेची ताकद महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वाढवून शेतकरी व युवकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.” या निवडीमुळे राज्यातील युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात शेतकरी आणि युवकांच्या प्रश्नांवर अधिक व्यापक आंदोलन उभे करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

मयुर बोर्डे (Mayur Borde) यांच्या निवडीबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या युवा आघाडीला नवी दिशा आणि बळ मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.