प्रादेशिक मनोरुग्णालयातील आणखी चार कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार

प्रादेशिक मनोरुग्णालयातील प्रशासकीय अव्यवस्था व अनियमितताप्रकरणी विभागीय चौकशी अहवालात आणखी चार कर्मचारी दोषी आढळल्याची माहिती उजेडात आली आहे.

प्रादेशिक मनोरुग्णालयातील आणखी चार कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार

Mental Hospital Inquiry

विभागीय चौकशी अहवालात आढळले दोषी

नागपूर (Mental Hospital Inquiry) : प्रादेशिक मनोरुग्णालयातील प्रशासकीय अव्यवस्था व अनियमितताप्रकरणी विभागीय चौकशी अहवालात आणखी चार कर्मचारी दोषी आढळल्याची माहिती उजेडात आली आहे. यात एक सेवानिवृत्त कर्मचारी देखील आहे. गत २६ फेब्रुवारीला आरोग्य उपसंचालकांकडून विभागीय चौकशी समितीचा ५६ पानी अहवाल सेवा आयुक्त व अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई येथे पाठविण्यात आला आहे. या अहवालानुसारच गेल्या सोमवारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. सतीश हुमणे यांना निलंबित करण्यात आले आहे. हे विशेष.

दोषींमध्ये एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा समावेश

विभागीय चौकशी अहवालात डॉ. हुमणे यांच्या व्यतिरिक्त आणखी चार कर्मचाऱ्यांदा दोषी ठरविले आहे. चौकशीकरिता तीन सदस्यीय समिती नेमली होती. समितीमध्ये अकोला येथील आरोग्य उपसंचालक डॉ. सुशीलकुमार वाकचौरे, आरोग्य सेवा संचालक पुणेचे अभिजीत पाटील आणि आरोग्य उपसंचालक व प्रशासकीय अधिकारी अकोला येथील सुनीता खडसे यांचा समावेश होता. विभागीय चौकशीनंतर आता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार कारवाई होईल, असे सूत्रांनी सांगितले.

विभागीय चौकशी अहवालाच्या आधारे १६ मार्चला प्रादेशिक मनोरुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश हुमणे यांना निलंबित करून गडचिरोलीतील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्यांच्या जागी वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. अमरीश मोहबे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. डॉ. हुमणे यांच्या व्यतिरिक्त चौकशी अहवालात आहार तज्ज्ञ अनुजा टाकरखेडे (खेरडे), वरिष्ठ लिपिक संजय बघेले, सेवानिवृत्त औषध निर्माण अधिकारी सुमेध सहारे आणि प्रभारी अधिसेविका रुपाली ठाकरे यांच्या नावाचा समावेश आहे.

चौकशी अहवालानुसार प्रादेशिक मनोरुग्णालय रुग्णांना असमाधानकारक आहार देणे, अव्यवस्था आणि अनियमितता केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. अहवालानुसार आहार विशेषज्ञ अनुजा टाकरखेडे (खेरडे) यांच्या विरुद्ध दुर्लक्षितपणा आणि त्रुट्याचा आरोप आहे.

कामचुकारपणा आणि अनियमितता

१३ डिसेंबर २०१५ रोजी आरोग्य मंत्र्यांनी केलेल्या आकस्मिक पाहणीत भोजन व्यवस्था आणि अनियमितेवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर चौकशीत अनेक त्रुट्या आढळून आल्या असून कामचुकारपणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अहवालानुसार मनोरुग्णालयात आहार सामुग्री खरेदी आणि स्वच्छतेत अनियमितता आढळून आली आहे. वरिष्ठ लिपिक संजय बघेले यांच्यावर कामचुकारपणा आणि अनियमिततेचा आरोप आहे. यामुळे शासनाचे आर्थिक नुकसान झाले आहे. तेथील खाद्य तेल आणि इतर सामुग्री गुणवत्तापूर्ण नव्हती. मुदतबाह्य साहित्य आढळले. या व्यतिरिक्त अनेक अनियमिता असल्याचा ठपका बघेले यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

संबंधित सामग्री

नळातून मीटरभराचा नाळू; कोरचीच्या ‘शुद्ध पाण्या’च्या दाव्याला धक्का!

नळातून मीटरभराचा नाळू; कोरचीच्या ‘शुद्ध पाण्या’च्या दाव्याला धक्का!

कोरचीच्या वार्ड क्रमांक १६ मध्ये नगरपंचायतीच्या नळातून मीटरभराचा नाळू निघाल्याचा प्रकार समोर आला असून, पाणीपुरवठ्याच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Sep 24, 2026
नागपूर मध्ये अंबिका नगरात तान्हा पोळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

नागपूर मध्ये अंबिका नगरात तान्हा पोळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

अंबिका नगर येथे बाळ मित्र शिव सेवा मंडळाच्या वतीने तान्हा पोळ्यानिमित्त महाआरती, नंदी बैल पूजा, गोपालकाला आणि बक्षीस वितरणासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Sep 10, 2026
नागपुरात गणेशोत्सवात डीजे-डॉल्बीवर बंदी; ३ सप्टेंबरपासून १ नोव्हेंबरपर्यंत आदेश लागू

नागपुरात गणेशोत्सवात डीजे-डॉल्बीवर बंदी; ३ सप्टेंबरपासून १ नोव्हेंबरपर्यंत आदेश लागू

नागपूर शहरात आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने डीजे आणि डॉल्बी साऊंड सिस्टीमच्या वापराबाबत कडक भूमिका घेतली आहे.

Sep 03, 2026
जिल्हा रुग्णालयात रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम; डॉक्टर, कर्मचारी व सफाई कामगारांना बांधल्या राख्या

जिल्हा रुग्णालयात रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम; डॉक्टर, कर्मचारी व सफाई कामगारांना बांधल्या राख्या

Hingoli Hospital Raksha Bandhan: महिला पतंजली योग समिती व लोकसेवा मंडळ रुग्ण मित्र यांच्या संयुक्त सहकार्याने शासकीय जिल्हा रुग्णालय, हिंगोली येथे बहीण-भावाच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेला रक्षाबंधन

Aug 31, 2026
‘आता पूर्वीसारखं काम करू शकत नाही’; नितीन गडकरींच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?

‘आता पूर्वीसारखं काम करू शकत नाही’; नितीन गडकरींच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका वक्तव्यामुळे भाजपच्या राजकीय वर्तुळात चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

Aug 25, 2026