राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बोर्डीकर यांनी घेतला विविध उपाययोजनांचा आढावा

Minister of State Meghnatai Sakore-Bordikar: दुष्काळसदृश परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करून शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाहीत..

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बोर्डीकर यांनी घेतला विविध उपाययोजनांचा आढावा

Minister Meghna Sakore-Bordikar

 

पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश

हिंगोली (Minister Meghna Sakore-Bordikar) : दुष्काळसदृश परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करून शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. तसेच पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांनी दिल्या.

हिंगोली येथील शिवाजी सभागृहात दुष्काळाच्या अनुषंगाने विविध उपाययोजनांचा आढावा राज्यमंत्री बोर्डीकर यांनी घेतला. यावेळी खासदार रामराव वडकुते, आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यासह संबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकरी चिंतेत आहे. त्यांना बँक कर्जाबाबत संपूर्ण सहकार्य करावे. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्जासाठी पुढाकार घ्यावा, असे निर्देश (Minister Meghna Sakore-Bordikar) त्यांनी दिले. 

दुष्काळामुळे भूजल पातळीत घट झाली असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध उपाययोजना कराव्यात. पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांसाठी पाण्याची उपलब्धता आणि चाऱ्याचे नियोजन करण्यास प्राधान्य द्यावे, असेही राज्यमंत्री बोर्डीकर यांनी सांगितले. व्हीबी-जी राम जी अंतर्गत जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कामे हाती घ्यावीत. पाण्याची उपलब्धता वाढण्यासाठी जलतारासारखे उपक्रम प्राधान्याने हाती घ्यावेत. दुष्काळामुळे नागरिकांचे स्थलांतर होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

आगीतील दुर्घटनाग्रस्त कुटुंबाची सांत्वनपर भेट
राज्यमंत्री बोर्डीकर (Minister Meghna Sakore-Bordikar) यांनी हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली येथे आगीच्या दुर्घटनेमुळे नुकसान झालेल्या ठिकाणाची पाहणी केली. या दुर्घटनेतील मृत कर्मचारी दिलीप दोडके यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.