आ. तानाजीराव मुटकुळे

पावसाने दडी मारल्याने आ. तानाजीराव मुटकुळे यांचे बळीराजासाठी गणरायाकडे साकडे

MLA Tanajirao Mutkule: . तानाजीराव मुटकुळे यांना सध्या वैद्यकीय कारणामुळे डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. तरीही मतदारसंघातील शेतकर्‍यांची चिंता त्यांना स्वस्थ बसू देत नाही.

पावसाने दडी मारल्याने आ. तानाजीराव मुटकुळे यांचे बळीराजासाठी गणरायाकडे साकडे

MLA Tanajirao Mutkule

हिंगोली (MLA Tanajirao Mutkule) : आ. तानाजीराव मुटकुळे यांना सध्या वैद्यकीय कारणामुळे डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. तरीही मतदारसंघातील शेतकर्‍यांची चिंता त्यांना स्वस्थ बसू देत नाही. पावसाने गेल्या काही दिवसांपासून दडी मारल्याने हवालदिल झालेल्या बळीराजाला सुखी ठेवण्यासाठी त्यांनी श्री स्थापनेच्या दिवशी  १४ सप्टेंबरला श्री गणपती बाप्पाकडे आर्त साकडे घातले आहे.

गणेश चतुर्थी निमित्त त्यांनी संदेश देताना 'सर्व भाविक भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना आहे, आज आमचा शेतकरी हवालदिल झालेला आहे. गेल्या एक-दीड महिन्यापासून पाऊस नसल्यामुळं पिकं जाग्यावर करपून जात आहेत. गेल्या दोन-चार दिवसात थातूर-मातूर कुठे पाऊस पडला, पण या पावसाचं रूपांतर पूर्ण विधानसभा, पूर्ण जिल्ह्यात व्हावं, नदी-नाले भरून आमचे सर्व तलाव भरावेत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.'सध्या वैद्यकीय विश्रांतीवर असतानाही आमदार मुटकुळे( MLA Tanajirao Mutkule) यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नावरून थेट गणरायाला हाक घातल्याने त्यांच्या या भावनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

गेल्या दीड महिन्यापासून पावसाचा खंड पडल्याने हिंगोली जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, तूर या खरीप पिकांना फटका बसला आहे.विश्रांती काळातही मतदारसंघातील शेतीच्या परिस्थितीची जाणीव ठेवून आमदारांनी बळीराजाच्या सुखासाठी केलेली ही प्रार्थना शेतकर्‍यांसाठी दिलासा देणारी ठरत आहे.

टैग्स: MLA Tanajirao Mutkule

संबंधित सामग्री

हिंगोली: बासंबा चौक 'अंडरग्राउंड' भुयारी मार्गाच्या कामाने वेधले लक्ष

हिंगोली: बासंबा चौक 'अंडरग्राउंड' भुयारी मार्गाच्या कामाने वेधले लक्ष

Hingoli Underground Subway: हिंगोलीतील बासंबा चौकातील अंडरग्राउंड भुयारी मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या पाठपुराव्यातून कामाला गती मिळाली आहे.

Mar 29, 2026