अजित पवार जयंती

अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर

Ajit Pawar jayanti: लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव फरहान अमीन यांच्या पुढाकाराने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर

Ajit Pawar jayanti

 

फरहान अमीन यांच्या पुढाकाराने शेकडो विद्यार्थ्यांना नेत्र तपासणीचा लाभ

पातूर (Ajit Pawar jayanti) : लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव फरहान अमीन यांच्या पुढाकाराने डॉ. वंदनाताई जगन्नाथ ढोणे ग्रामीण आयुर्वेदिक महाविद्यालय, पातूर येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

शिबिरामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून नेत्र तपासणी करण्यात आली. डोळ्यांचे आरोग्य, दृष्टीदोषांचे लवकर निदान तसेच योग्य उपचार व काळजी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला आणि मोफत नेत्र तपासणीचा लाभ घेतला.

यावेळी राष्ट्रवादीचे मा. जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे,राम अमानकर, शेख मेहबूब , अमीन बाळापूर , साखरकर गुरुजी, राजेश मालोकर आदी उपस्थित होते. यावेळी फरहान अमीन यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असून अशा आरोग्यविषयक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होते. भविष्यातही विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

या (Ajit Pawar jayanti) उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांनी व महाविद्यालय प्रशासनाने समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.