Mugdha Deshmukh

कुटुंबीयांना न सांगता लंडनहून भारतात परतलेल्या तरुणीचा मृतदेह पुण्यामध्ये आढळला

लंडनमध्ये असल्याचा कुटुंबीयांचा समज; फूड डिलिव्हरी व्यवहारांमुळे भारतातील लोकेशन समोर आले. पुण्यातील फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह आढळला.

कुटुंबीयांना न सांगता लंडनहून भारतात परतलेल्या तरुणीचा मृतदेह पुण्यामध्ये आढळला

एमबीएच्या शिक्षणासाठी जुलै 2025 मध्ये ब्रिटनला गेली होती मुग्धा देशमुख; ऑगस्टमध्ये गुपचूप भारतात परतली, मृत्यूचे कारण शोधण्यासाठी व्हिसेरा राखीव

पुणे : परदेशात शिक्षणासाठी गेलेली मुलगी लंडनमध्येच असल्याचा समज असलेल्या कुटुंबीयांना तिच्या भारतातील वास्तव्याची माहिती बँक खात्यातील फूड डिलिव्हरीच्या व्यवहारांमधून मिळाली. त्यानंतर सुरू झालेल्या शोधमोहिमेत पुण्यातील गहुंजे परिसरातील एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धा देशमुख हिचा मृतदेह आढळून आला. गुरुवारी ही घटना उघडकीस आली असून, तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मुग्धा देशमुख ही मूळची छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी होती. एमबीएचे शिक्षण घेण्यासाठी ती जुलै 2025 मध्ये ब्रिटनला गेली होती. लंडनमध्ये स्वतंत्रपणे राहत असताना ती काही ठिकाणी अर्धवेळ नोकरीही करत होती. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस तिने कुटुंबीयांना कोणतीही माहिती न देता ब्रिटन सोडले आणि भारतात परतली होती.

दरम्यान, मुग्धा आपल्या कुटुंबीयांच्या संपर्कात फोन आणि मेसेजच्या माध्यमातून होती. मात्र, 24 ऑक्टोबरपासून तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर तिचा मोबाईलही बंद येऊ लागला. यामुळे चिंताग्रस्त झालेल्या वडील अविनाश देशमुख यांनी यासंदर्भात छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

मुग्धाच्या कुटुंबीयांनी लंडनमधील तिच्या मैत्रिणीशी संपर्क साधला असता, 22 ऑक्टोबर रोजी शेवटचे मेसेजद्वारे बोलणे झाल्याची माहिती तिने दिली. मुग्धाचा शोध लागत नसल्याने या मैत्रिणीने लंडन पोलिसांकडे ती बेपत्ता असल्याची तक्रारही केली. मात्र, मुग्धा ऑगस्ट महिन्याच्या अखेरीसच ब्रिटनमधून बाहेर पडल्याची माहिती लंडन पोलिसांकडून देण्यात आली.

बँक खात्यातील व्यवहारांमुळे भारतात परतल्याचा संशय

मुलीचा ठावठिकाणा लागत नसल्याने देशमुख कुटुंबीयांनी भारतीय यंत्रणांसह भारतीय उच्चायुक्तालयाकडेही मदतीची मागणी केली. याचदरम्यान वडील अविनाश देशमुख यांनी मुग्धाच्या बँक खात्याचे व्यवहार तपासले. 8 ते 25 ऑक्टोबर या कालावधीत फूड डिलिव्हरी आणि ऑनलाइन सेवा पुरवणाऱ्या प्लॅटफॉर्मवर अनेक आर्थिक व्यवहार झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

यातील एका व्यवहाराचे लोकेशन छत्रपती संभाजीनगरमधील उस्मानपुरा परिसराशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यामुळे मुग्धा भारतात परतली असण्याची शक्यता कुटुंबीयांना वाटू लागली. तिच्या सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झाल्याने त्यांनी छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडे धाव घेतली.

गहुंजेतील लॉढा बेलमोंडो सोसायटीत आढळला मृतदेह

कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी मुग्धाचा शोध सुरू केला. तपासादरम्यान तिचे लोकेशन पिंपरी-चिंचवडमधील गहुंजे येथील लॉढा बेलमोंडो या निवासी संकुलात असल्याचे समोर आले.

यानंतर पोलिसांनी संबंधित फ्लॅटवर जाऊन तपासणी केली. घर आतून बंद असल्याने चावी बनवणाऱ्या व्यक्तीच्या मदतीने फ्लॅटमध्ये प्रवेश करण्यात आला. त्यावेळी मुग्धा मृतावस्थेत आढळून आली.

शिरगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी या घटनेला दुजोरा दिला. मुग्धाच्या शरीरावर बाह्य जखमांच्या कोणत्याही खुणा आढळल्या नसल्याचे त्यांनी सांगितले. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी तिचे व्हिसेरा नमुने जतन करण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूमागील कारण स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.

लंडनमध्ये असल्याचे कुटुंबीयांना वाटत असताना मुग्धा प्रत्यक्षात भारतात परतली होती. फूड डिलिव्हरी आणि ऑनलाइन व्यवहारांच्या धाग्यांमुळे तिचा ठावठिकाणा समोर आला. मात्र, पुण्यातील फ्लॅटमध्ये तिचा मृतदेह आढळल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

 

संबंधित सामग्री

पुण्यात सारसबाग परिसरात अल्टो कारमध्ये आढळला मृतदेह; दुर्गंधीमुळे घटना उघड

पुण्यात सारसबाग परिसरात अल्टो कारमध्ये आढळला मृतदेह; दुर्गंधीमुळे घटना उघड

पुण्यात सारसबाग परिसरात बंद अल्टो कारमध्ये तरुणाचा मृतदेह आढळला. अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याने घातपाताचा संशय; पोलिसांकडून CCTV तपास सुरू.

Oct 30, 2026
पुण्यात पंचतारांकित हॉटेलमध्ये हायप्रोफाइल देहव्यवसायाचा पर्दाफाश; दोन तरुणींची सुटका, चौघांविरुद्ध गुन्हा

पुण्यात पंचतारांकित हॉटेलमध्ये हायप्रोफाइल देहव्यवसायाचा पर्दाफाश; दोन तरुणींची सुटका, चौघांविरुद्ध गुन्हा

पुण्यात पंचतारांकित हॉटेलवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, आसाममधील तिघांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.

Oct 28, 2026
छत्रपती संभाजीनगरमध्ये भररस्त्यात बालमित्राची हत्या; कारने धडक दिल्यानंतर लाकडी दांड्याने हल्ला, आरोपीचे आत्मसमर्पण

छत्रपती संभाजीनगरमध्ये भररस्त्यात बालमित्राची हत्या; कारने धडक दिल्यानंतर लाकडी दांड्याने हल्ला, आरोपीचे आत्मसमर्पण

छत्रपती संभाजीनगरमध्ये बालमित्राची भरदिवसा हत्या झाल्याने खळबळ. संशयित पवन पाराशरचे आत्मसमर्पण; रोहित पवारांचा कायदा-सुव्यवस्थेवर सवाल.

Oct 24, 2026
 पुणे ते नागपूर, शिक्षक-पदवीधर मतदारसंघांत आज मतदान; कोण मारणार बाजी?

पुणे ते नागपूर, शिक्षक-पदवीधर मतदारसंघांत आज मतदान; कोण मारणार बाजी?

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांत मतदान. पाच जागांसाठी १८२ उमेदवार; मतदानाची वेळ, जिल्हे आणि मान्य ओळखपत्रांची माहिती जाणून घ्या.

Oct 23, 2026
घरासमोर थांबण्यावरून बाप-लेकाची हत्या! संभाजी नगर मध्ये रक्तरंजित थरार

घरासमोर थांबण्यावरून बाप-लेकाची हत्या! संभाजी नगर मध्ये रक्तरंजित थरार

छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमध्ये देवीच्या दर्शनावरून झालेल्या वादात वडील आणि १७ वर्षीय मुलाची हत्या. पाच आरोपी अटकेत; न्यायालयाकडून २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी.

Oct 21, 2026