Mumbai Auto Taxi Marathi Rule

मुंबईत मराठी न येणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाईचा धडाका; 2,500 हून अधिक चालकांना नोटिसा, काहींनी सेवा बंद केल्याचा

मुंबईसह संपूर्ण एमएमआर परिसरात रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या व्यवहारिक मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी सुरू झाल्याने वाहतूक क्षेत्रात मोठी चर्चा निर्माण झाली आहे.

मुंबईत मराठी न येणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाईचा धडाका; 2,500 हून अधिक चालकांना नोटिसा, काहींनी सेवा बंद केल्याचा

RTO तपासणीच्या भीतीने रेल्वे स्थानक, मॉल आणि प्रमुख मार्ग टाळल्याची माहिती; कांदिवलीत चालकांचा संप, तर 1 सप्टेंबरपासून मुंबई-MMR मध्ये रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ

मुंबईसह संपूर्ण एमएमआर परिसरात रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या व्यवहारिक मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी सुरू झाल्याने वाहतूक क्षेत्रात मोठी चर्चा निर्माण झाली आहे. प्रादेशिक परिवहन विभागाकडून मराठीचे आवश्यक ज्ञान नसलेल्या चालकांवर कारवाई केली जात असून काही चालकांना कारणे दाखवा नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर काही चालकांनी तपासणी टाळण्यासाठी रेल्वे स्थानके, मॉल्स आणि गर्दीच्या प्रमुख मार्गांवर सेवा देणे टाळल्याची माहिती समोर आली आहे.

RTO तपासणीची माहिती चालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुपवर संदेश मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असल्याचे सांगितले जात आहे. काही चालकांनी काही काळासाठी सेवा थांबवली, तर काहींनी आपली वाहने एमएमआरच्या बाहेर नेल्याचा दावा केला आहे. परिणामी मुंबईतील काही भागांमध्ये रिक्षा आणि टॅक्सींची उपलब्धता कमी झाल्याचे युनियनकडून सांगण्यात आले आहे.

मराठी शिकण्यासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध करून न देता थेट शो-कॉज नोटिसा बजावल्या जात असल्याचा आक्षेप काही चालकांनी घेतला आहे. नोटीस मिळालेल्या चालकांचा एक गट या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. दरम्यान, गेल्या चार दिवसांत राज्यभरातील 2,500 हून अधिक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना नोटिसा बजावण्यात आल्याचे समोर आले आहे.

कांदिवलीत चालकांचा संप; प्रवाशांचे हाल

मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरातही या कारवाईचे पडसाद उमटले आहेत. परिवहन विभागाच्या मराठी भाषेच्या सक्तीविरोधात काही अमराठी रिक्षा चालक आक्रमक झाले असून, लिंक रोड परिसरात त्यांनी संप पुकारल्याची माहिती आहे.

अचानक रिक्षा सेवा बंद झाल्याने कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कांदिवली पोलिसांनी हस्तक्षेप करत चालकांना पुन्हा रिक्षा सुरू करण्याचे आवाहन केले. मात्र, परिवहन विभागाच्या सुरू असलेल्या कारवाईमुळे चालकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने त्यांनी सेवा बंदच ठेवल्याचे सांगितले जात आहे.

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी व्यवहारिक मराठी अनिवार्य

महाराष्ट्रात प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या व्यावसायिक वाहनांच्या चालकांना प्रवाशांशी प्रभावी संवाद साधता यावा, यासाठी व्यवहारिक मराठीचे ज्ञान आवश्यक करण्यात आले आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 मध्ये करण्यात आलेल्या सुधारणांद्वारे ही अट अधिक स्पष्ट करण्यात आली आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, आवश्यक मराठीचे ज्ञान नसलेल्या चालकाच्या वाहन चालविण्याच्या परवान्यावरील संबंधित अधिकृतता निलंबित किंवा रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

शासनाच्या अधिसूचनेनुसार Maharashtra Motor Vehicles (Amendment) Rules, 2026 अंतर्गत महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 मध्ये विविध बदल करण्यात आले आहेत. या सुधारणांमध्ये रिक्षा, टॅक्सी, इलेक्ट्रॉनिक मीटर असलेल्या ॲप-आधारित मोटार कॅब तसेच त्यांच्या परवाना आणि अधिकृततेशी संबंधित चालक व परमिटधारकांसाठी व्यवहारिक मराठीच्या ज्ञानाची अट स्पष्ट करण्यात आली आहे.

1 सप्टेंबरपासून मुंबई-MMR मध्ये रिक्षा-टॅक्सी महागणार

एकीकडे मराठी भाषेच्या मुद्द्यावरून रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाई सुरू असताना दुसरीकडे मुंबईसह एमएमआर परिसरातील प्रवाशांना भाडेवाढीचा सामना करावा लागणार आहे.

1 सप्टेंबर 2026 पासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, वसई, विरार आणि पालघर या भागांमध्ये ऑटो रिक्षा आणि टॅक्सीचे भाडे वाढणार आहे. या भाडेवाढीच्या प्रस्तावाला MMRTA ची मंजुरी मिळाली आहे.

परिवहन आयुक्तांनी 20 ऑगस्ट रोजी पाठविलेला प्रस्ताव MMRTA ने मंजूर केला. यापूर्वी फेब्रुवारी 2025 मध्ये रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्यात आली होती.

रिक्षा-टॅक्सी युनियनने मांडलेल्या मुद्द्यांच्या आधारे यावेळचा भाडेवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. इंधनाचे वाढते दर, वाहनांची देखभाल व दुरुस्ती, विम्याचे हप्ते तसेच परवान्याशी संबंधित खर्च अशा वाढलेल्या परिचालन खर्चाचा प्रस्तावात उल्लेख करण्यात आला आहे.

त्यामुळे मुंबई आणि एमएमआरमध्ये एकीकडे मराठी भाषेच्या नियमावरून रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाईचा मुद्दा तापला असताना, 1 सप्टेंबरपासून होणाऱ्या भाडेवाढीमुळे प्रवाशांच्या खिशावरही अतिरिक्त भार पडणार आहे.

संबंधित सामग्री

भाईंदरमध्ये पर्युषण पर्वावरून पुन्हा वाद; मेथीच्या भाजीवरून विद्यार्थ्याला दंड, तपोवन विद्यालयाला नोटीस

भाईंदरमध्ये पर्युषण पर्वावरून पुन्हा वाद; मेथीच्या भाजीवरून विद्यार्थ्याला दंड, तपोवन विद्यालयाला नोटीस

भाईंदरच्या तपोवन विद्यालयात मेथीची भाजी डब्यात आणल्याने विद्यार्थ्यावर दंडात्मक कारवाई झाल्याचा आरोप. मनसेच्या तक्रारीनंतर शिक्षण विभागाची नोटीस.

Sep 23, 2026
मीरा-भाईंदरमध्ये ५५% मतदार बोगस? प्रताप सरनाईकांचा भाजपवर गंभीर आरोप; नरेंद्र मेहतांचा पलटवार

मीरा-भाईंदरमध्ये ५५% मतदार बोगस? प्रताप सरनाईकांचा भाजपवर गंभीर आरोप; नरेंद्र मेहतांचा पलटवार

राज्यातील महायुती सरकारमधील भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.

Sep 02, 2026
शिवसेना लातूर जिल्हाप्रमुखाची गीतातून आनंद दिघेंना स्वरांजली!

शिवसेना लातूर जिल्हाप्रमुखाची गीतातून आनंद दिघेंना स्वरांजली!

आनंद दिघे यांच्या कार्याची आणि विचारांची आठवण करून देण्यासाठी त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने हे गीत तयार करण्यात आले आहे.

Aug 27, 2026
मुंबईत रिक्षा-टॅक्सी प्रवास महागणार; १ सप्टेंबरपासून नवे भाडेदर लागू

मुंबईत रिक्षा-टॅक्सी प्रवास महागणार; १ सप्टेंबरपासून नवे भाडेदर लागू

मुंबई महानगर प्रदेशातील रिक्षा आणि टॅक्सी प्रवाशांच्या खिशावर आता अतिरिक्त भार पडणार आहे.

Aug 21, 2026
‘मराठी सक्तीची नव्हे, भक्तीची भाषा’; १.२५ लाख रिक्षा-टॅक्सी चालकांनी घेतले मराठीचे धडे - एकनाथ शिंदे

‘मराठी सक्तीची नव्हे, भक्तीची भाषा’; १.२५ लाख रिक्षा-टॅक्सी चालकांनी घेतले मराठीचे धडे - एकनाथ शिंदे

महाराष्ट्रात मराठी भाषेचा प्रसार कायद्याच्या दबावातून नव्हे, तर प्रेम आणि आत्मीयतेतून व्हावा, अशी भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली.

Aug 18, 2026