Mumbai BMC

Mumbai BMC Politics: महापौर रितू तावडे-राजेश्री शिरवडकर यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर; भाजपची आज महत्त्वाची बैठक

मुंबई महापालिकेची सत्ता भाजपच्या ताब्यात आल्यानंतर आता पक्षाच्या अंतर्गत राजकारणातील मतभेद समोर येऊ लागल्याची चर्चा आहे.

Mumbai BMC Politics: महापौर रितू तावडे-राजेश्री शिरवडकर यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर; भाजपची आज महत्त्वाची बैठक

शिक्षण समितीच्या शिफारशीवरून वाद; ‘झारीतील शुक्राचार्य’ वक्तव्याचीही चर्चा, अमित साटम यांच्या उपस्थितीत वरिष्ठ नेते साधणार समन्वय

मुंबई महापालिकेची सत्ता भाजपच्या ताब्यात आल्यानंतर आता पक्षाच्या अंतर्गत राजकारणातील मतभेद समोर येऊ लागल्याची चर्चा आहे. महापौर रितू तावडे आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांच्यातील कथित मतभेदांचा मुद्दा आता वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई भाजपकडून आज महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

शिक्षण समितीवरील एका शिफारशीच्या मुद्द्यावरून महापौर रितू तावडे चर्चेत आल्या होत्या. बुडीत क्लासचालकाची शिक्षण समितीवर शिफारस केल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला होता. त्यानंतर या मुद्द्याला राजकीय वळण मिळाले. तावडे यांनी पक्षातील काही व्यक्तींकडून अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप करत ‘झारीतील शुक्राचार्य’ असा उल्लेख केला होता.

दरम्यान, महापौरांनी शिक्षण समितीला पाठवलेले पत्र समोर आल्यानंतर या प्रकरणाची चर्चा आणखी वाढली. पत्रातील मजकूर आणि त्यानंतर महापौरांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या निशाण्यावर शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवडकर असल्याची चर्चा भाजपच्या अंतर्गत वर्तुळात सुरू झाली आहे.

महापौर आणि शिक्षण समिती अध्यक्षांमध्ये मतभेदांची चर्चा

रितू तावडे आणि राजेश्री शिरवडकर यांच्यात सुरुवातीपासूनच मतभेद असल्याचे पक्षातील वर्तुळात बोलले जात आहे. दोन्ही पदाधिकाऱ्यांकडून सार्वजनिकरीत्या एकमेकांवर थेट आरोप करण्यात आले नसले, तरी महापालिकेतील निर्णयप्रक्रिया तसेच समित्यांच्या कामकाजावरून दोघांमध्ये मतभिन्नता असल्याची चर्चा आहे.

शिक्षण समितीशी संबंधित पत्र सार्वजनिक झाल्यानंतर या कथित मतभेदांना अधिक उघड स्वरूप मिळाल्याचे चित्र आहे. त्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेत्यांना हस्तक्षेप करून दोन्ही पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय निर्माण करण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे मानले जात आहे.

अमित साटम यांच्या उपस्थितीत आज बैठक

या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपने आज बैठक बोलावली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीसाठी महापौर रितू तावडे, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर आणि सभागृह नेते गणेश खणकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

महापालिकेतील पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासोबतच प्रमुख पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचाही मुद्दा बैठकीत चर्चेला येण्याची शक्यता आहे. विशेषतः शिक्षण समितीच्या शिफारशीवरून निर्माण झालेला वाद कशा पद्धतीने सोडवायचा, यावर वरिष्ठ नेते भूमिका घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सत्ता मिळाल्यानंतर भाजपसमोर अंतर्गत समन्वयाचे आव्हान

मुंबई महापालिकेत अनेक वर्षांच्या कालावधीनंतर भाजप सत्तेत आले आहे. महापौरपदासह महत्त्वाच्या समित्यांची जबाबदारीही भाजपकडे आहे. अशा वेळी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरू होणे ही भाजपसाठी महत्त्वाची राजकीय बाब मानली जात आहे.

महापौर विविध मुद्द्यांवरून चर्चेत येत असल्याने काही नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचीही चर्चा आहे. तसेच वरिष्ठ नेतृत्व आणि नगरसेवक यांच्यात अपेक्षित समन्वयाचा अभाव असल्याचे पक्षातील काही नेत्यांकडून सांगितले जात असल्याचे समजते.

‘झारीतील शुक्राचार्य’ वक्तव्याचा संदर्भ कोणाकडे?

रितू तावडे यांनी यापूर्वी केलेल्या ‘झारीतील शुक्राचार्य’ या उल्लेखामागे नेमका कोणाचा संदर्भ होता, याबाबत भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. शिक्षण समितीला पाठवलेले पत्र समोर आल्यानंतर या वक्तव्याचा संबंध राजेश्री शिरवडकर यांच्याशी जोडला जात असल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे.

त्यामुळे आजच्या बैठकीकडे विशेष लक्ष लागले आहे. महापौर आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षा यांच्यातील कथित मतभेद दूर करण्यासोबतच महापालिकेतील आगामी निर्णयप्रक्रियेत पक्षांतर्गत समन्वय कसा कायम ठेवायचा, यावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेची सत्ता हातात आल्यानंतर भाजपमध्ये निर्माण झाल्याची चर्चा असलेली ही अंतर्गत धुसफूस आजच्या बैठकीनंतर कमी होते का, की दोन्ही पदाधिकाऱ्यांमधील कथित ‘कोल्ड वॉर’ आणखी वाढते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

मुंबईच्या ३४% पाण्याची गळती-चोरीत नासाडी; गारगाई धरणाएवढ्या तीन धरणांचे पाणी वाया

मुंबईच्या ३४% पाण्याची गळती-चोरीत नासाडी; गारगाई धरणाएवढ्या तीन धरणांचे पाणी वाया

मुंबईत रोज १,३९० दशलक्ष लिटरहून अधिक पाणी गळती, चोरी आणि अनधिकृत वापरामुळे वाया जाते. गारगाईसारख्या तीन धरणांच्या क्षमतेइतकी ही नासाडी आहे.

Oct 03, 2026
मुंबईच्या महापौर रितू तावडेंना सत्र न्यायालयाचा ३०० रुपयांचा दंड; २०१६च्या शिक्षक मारहाण प्रकरणात वारंवार गैरहजेरी

मुंबईच्या महापौर रितू तावडेंना सत्र न्यायालयाचा ३०० रुपयांचा दंड; २०१६च्या शिक्षक मारहाण प्रकरणात वारंवार गैरहजेरी

२०१६च्या शिक्षक मारहाण प्रकरणात वारंवार गैरहजेरीमुळे मुंबईच्या महापौर रितू तावडेंना सत्र न्यायालयाने ३०० रुपयांचा दंड ठोठावला.

Sep 24, 2026
मुंबई महापालिकेच्या ८०० अभियंत्यांच्या बदल्यांचा मार्ग मोकळा; आता रँडमायझेशन प्रणालीद्वारे प्रक्रिया

मुंबई महापालिकेच्या ८०० अभियंत्यांच्या बदल्यांचा मार्ग मोकळा; आता रँडमायझेशन प्रणालीद्वारे प्रक्रिया

मुंबई महापालिकेतील सुमारे ८०० अभियंत्यांच्या बदल्यांसाठी ऑनलाईन रँडमायझेशन प्रणाली लागू करण्यात आली असून १ ते १५ ऑक्टोबरदरम्यान बदली आदेश जारी होणार आहेत.

Sep 21, 2026
मुंबईत ठाकरेसेनेला मोठा धक्का; विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द

मुंबईत ठाकरेसेनेला मोठा धक्का; विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द

मुंबईच्या राजकारणात शिवसेना (UBT)ला मोठा धक्का बसला आहे.

Sep 02, 2026
महानगरपालिकेत ‘आकृतीबंधा’वरून असंतोष; प्रशासनाच्या निर्देशांविरोधात म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशन आक्रमक

महानगरपालिकेत ‘आकृतीबंधा’वरून असंतोष; प्रशासनाच्या निर्देशांविरोधात म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशन आक्रमक

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त (सामान्य प्रशासन) यांनी १३ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केलेल्या निर्देशांमुळे पालिका अधिकारी, अभियंते आणि कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

Aug 22, 2026