Mumbai Local Train crime

मुंबई लोकलमध्ये धक्कादायक प्रकार; किरकोळ वादातून तरुणाला धावत्या ट्रेनमधून ढकलले, आरोपीला अटक

मुंबईच्या उपनगरीय लोकलमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा समोर आला आहे. दरवाजाजवळ उभे राहण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान हिंसक हल्ल्यात झाले.

मुंबई लोकलमध्ये धक्कादायक प्रकार; किरकोळ वादातून तरुणाला धावत्या ट्रेनमधून ढकलले, आरोपीला अटक

Mumbai Local Train crime

दरवाजात उभे राहण्यावरून वाद; २४ वर्षीय तौसिफ शेखच्या पाठीवर लाथ मारल्याने खाली पडून गंभीर दुखापत

मुंबईच्या उपनगरीय लोकलमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा समोर आला आहे. दरवाजाजवळ उभे राहण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान हिंसक हल्ल्यात झाले. सहप्रवाशाला दरवाजातून आत येण्यास सांगितल्याच्या रागातून एका ३० वर्षीय तरुणाने २४ वर्षीय प्रवाशाच्या पाठीवर जोरदार लाथ मारल्याचा प्रकार घडला. या हल्ल्यात संबंधित प्रवासी धावत्या लोकलमधून खाली पडून गंभीर जखमी झाला. मंगळवारी रात्री गोरेगाव-बोरिवलीदरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी नालासोपारा येथील राहुलकुमार पांडे याला अटक केली आहे.

जखमी प्रवाशाचे नाव तौसिफ शेख असून तो नालासोपारा येथे राहतो. तो कारपेंटर म्हणून काम करतो. मंगळवारी रात्री तौसिफ त्याचा सहकारी हुसेन अली याच्यासोबत गोरेगावहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या रात्री ८.४१ वाजताच्या धीम्या लोकलमधून प्रवास करत होता. दोघेही सामान्य डब्यात दरवाजाजवळ उभे होते.

लोकल कांदिवली स्थानकात पोहोचल्यानंतर राहुलकुमार पांडे त्याच डब्यात चढला. तो तौसिफ आणि हुसेन यांच्या समोर उभा राहिला. त्यानंतर तिघांमध्ये वाद सुरू झाला. लोकल बोरिवलीच्या दिशेने पुढे जात असताना दरवाजाजवळ गर्दी होऊ नये आणि इतर प्रवाशांना उतरताना अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी तौसिफने पांडेला आत सरकण्यास सांगितले. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला.

वाद वाढत असल्याचे पाहून हुसेन अलीने मध्यस्थी करून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर दोघांमध्ये झटापट झाली. बोरिवली स्थानकात लोकल दाखल झाल्यानंतर ट्रेन पुन्हा पुढे निघत असताना पांडेने तौसिफच्या पाठीवर जोरात लाथ मारली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे तौसिफचा तोल गेला आणि तो धावत्या लोकलमधून खाली पडला.

घटनेनंतर तौसिफ जखमी अवस्थेत बोरिवली स्थानकात पोहोचला. रेल्वे पोलिसांनी त्याला तातडीने प्रथमोपचारासाठी स्थानकातील आपत्कालीन वैद्यकीय कक्षात नेले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्याला कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या डोक्याला टाके घालण्यात आले असून डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, तौसिफचा सहकारी हुसेन अली याने राहुलकुमार पांडेला रेल्वे पोलिसांच्या चौकीत आणले. पोलिसांनी पांडेला ताब्यात घेतल्यानंतर त्याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास रेल्वे पोलिसांकडून सुरू आहे.

मध्यरात्री आईला समजले मुलगा रुग्णालयात

तौसिफ नेहमीच्या वेळेत घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबीयांची चिंता वाढली होती. त्यातच त्याचा मोबाईल खराब असल्यामुळे कुटुंबीयांना त्याच्याशी संपर्क साधता आला नाही. मध्यरात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास तौसिफ रुग्णालयात असल्याची माहिती त्याच्या आईला मिळाली. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालय गाठले.

लोकलमधील एका किरकोळ वादातून प्रवाशाला धावत्या ट्रेनमधून खाली पडून जखमी व्हावे लागल्याने मुंबई उपनगरीय रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

आठवडाभरात लोकलमधील वादाची दुसरी धक्कादायक घटना

मुंबई उपनगरीय रेल्वेत क्षुल्लक कारणावरून झालेला वाद प्रवाशाच्या जीवावर बेतण्याची ही आठवडाभरातील दुसरी घटना आहे. मागील आठवड्यात वांद्रे-माहिमदरम्यान दिव्यांगांच्या डब्यात बसण्याच्या जागेवरून वाद झाला होता. त्यावेळी एका ६५ वर्षीय व्यक्तीला धक्का देण्यात आला. धावत्या रेल्वेतून खाली पडलेल्या या व्यक्तीचा भाभा रुग्णालयात उपचार सुरू करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता.

सलग घडलेल्या या घटनांमुळे लोकलमधील किरकोळ वाद हिंसक होऊ नयेत आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई व्हावी, अशी गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

संबंधित सामग्री

गांधींच्या वर्धा जिल्ह्याला हादरवणारी घटना; तरुणीवर सामूहिक अत्याचाराचा आरोप

गांधींच्या वर्धा जिल्ह्याला हादरवणारी घटना; तरुणीवर सामूहिक अत्याचाराचा आरोप

वर्ध्यात 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचाराचा आरोप; पाच अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल. रेल्वे स्थानकातील CCTV आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू.

Sep 26, 2026

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून सीए तणावात; आत्महत्येपूर्वी WhatsApp मेसेज

मुंबईत ३९ वर्षीय सीएने ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वीच्या WhatsApp मेसेजच्या आधारे पत्नी आणि तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल.

Sep 24, 2026
माऊंट मेरी जत्रेत नशेत महिलेचा धिंगाणा; महिला पोलीस शिपाईच्या दंडाला चावा

माऊंट मेरी जत्रेत नशेत महिलेचा धिंगाणा; महिला पोलीस शिपाईच्या दंडाला चावा

माऊंट मेरी जत्रेदरम्यान वांद्र्यात पोलिसांशी हुज्जत घालताना महिलेने महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या दंडाला चावा घेतला. निकी जसिंग्टोला अटक करण्यात आली.

Sep 23, 2026
CSMT रेल्वे पोलिसांच्या कोठडीत 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू; प्रकरणाचा तपास CIDकडे

CSMT रेल्वे पोलिसांच्या कोठडीत 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू; प्रकरणाचा तपास CIDकडे

CSMTमध्ये 35 वर्षीय इमरान शेखचा रेल्वे पोलिसांच्या ताब्यात मृत्यू; नातेवाईकांचा मारहाणीचा आरोप, महाराष्ट्र CIDकडून तपास सुरू.

Sep 22, 2026
मुंबई लोकलमध्ये विद्यार्थिनीवर जबरदस्तीचा प्रयत्न; डहाणू-बोरिवली मार्गावरील धक्कादायक घटना

मुंबई लोकलमध्ये विद्यार्थिनीवर जबरदस्तीचा प्रयत्न; डहाणू-बोरिवली मार्गावरील धक्कादायक घटना

मुंबई लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र, पहाटेच्या वेळेत महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

Sep 03, 2026