Mumbai Police Canteen

वर्षभराच्या तक्रारींचा आठवडाभरात निकाल; मुंढेंनी केली मुंबई पोलिसांच्या कॅन्टीनवर कारवाई

तुकाराम मुंढेंच्या FDA चा मुंबई पोलिसांच्या नागपाडा कॅन्टीनला दणका! अस्वच्छतेप्रकरणी चालकाला 75 हजारांचा दंड; भेसळविरोधी मोहिमाही सुरूच.

वर्षभराच्या तक्रारींचा आठवडाभरात निकाल; मुंढेंनी केली मुंबई पोलिसांच्या कॅन्टीनवर कारवाई

Mumbai Police Canteen

नागपाडा येथील मोटार ट्रान्सपोर्ट विभागाच्या कॅन्टीनमधील अस्वच्छतेवर FDA ची कारवाई; वर्षभर तक्रारी करूनही प्रश्न प्रलंबित असल्याने पोलिस कर्मचाऱ्यांनी घेतली होती मुंढेंकडे धाव

मुंबई : अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत आणि स्वच्छतेबाबत तक्रारी करूनही वर्षभर प्रलंबित राहिलेल्या प्रश्नावर अखेर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाई केली आहे. मुंबई पोलीस दलातील नागपाडा येथील मोटार ट्रान्सपोर्ट विभागाच्या कॅन्टीनमधील अस्वच्छतेची गंभीर दखल घेत एफडीएने कॅन्टीन चालकाला तब्बल 75 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रमुख तुकाराम मुंढे यांनी तक्रार मिळाल्यानंतर अवघ्या आठवडाभरात ही कारवाई केल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई पोलीस दलातील अनेक कर्मचारी मागील वर्षभरापासून नागपाडा येथील कॅन्टीनमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांचा दर्जा आणि तेथील अस्वच्छतेबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी करत होते. मात्र, या तक्रारींची अपेक्षित दखल घेतली जात नसल्याने कर्मचाऱ्यांनी थेट अन्न व औषध प्रशासन विभागाकडे आपली कैफियत मांडली. त्यांनी तुकाराम मुंढे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर एफडीएच्या यंत्रणेने तातडीने दखल घेतली आणि आठवडाभरात कॅन्टीनची तपासणी करून दंडात्मक कारवाई केली.

विशेष म्हणजे, वर्षभर पाठपुरावा करूनही ज्या समस्येवर तोडगा निघाला नव्हता, ती समस्या तुकाराम मुंढे यांनी अल्पावधीत मार्गी लावली. त्यामुळे मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही चर्चा सुरू झाली आहे.

भेसळयुक्त खाद्यतेलाविरोधातील मोहीम सुरूच राहणार

दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांमधील भेसळीविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थ तयार करताना योग्य दर्जाच्या तेलाचा वापर होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

खाद्यतेलातील भेसळ रोखण्यासाठी एफडीएकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत खाद्यतेलाच्या 1,089 तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 80 परवाने रद्द करण्यात आले असून, 28,753 क्विंटल माल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती मुंढे यांनी दिली.

अन्न व्यावसायिकांनी खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत विशेष दक्षता घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. कालबाह्य झालेल्या अन्नपदार्थांची विक्री किंवा वापर होणार नाही, याची जबाबदारी प्रत्येक व्यावसायिकाने घ्यावी. व्यवसायाचे स्वरूप किंवा कंपनीचा आकार कितीही मोठा अथवा लहान असला, तरी नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

अन्न व्यवसायासाठी 22 नियमांच्या अनुपालन आदेशांची अंमलबजावणी

एफडीएचे काम केवळ दोषींवर कारवाई करण्यापुरते मर्यादित नसून अन्न व्यवसायात नियमांचे पालन सुनिश्चित करणे हेदेखील महत्त्वाचे उद्दिष्ट असल्याचे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले. यासाठी विभागाने विविध क्षेत्रांशी संबंधित अनुपालन आदेश जारी केले आहेत.

हॉटेल व्यवसाय, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, शालेय खाद्यपदार्थ यांसह विविध क्षेत्रांमध्ये कोणत्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, याबाबत आतापर्यंत 22 आदेश काढण्यात आले आहेत. अन्न व्यवसाय चालक, परवानाधारक आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यावर प्रशासनाचा भर असल्याचेही त्यांनी सांगितले.

कालबाह्य आणि खराब अन्न नष्ट केल्याचा पुरावा देणे बंधनकारक

दरम्यान, एफडीएने कालबाह्य, खराब आणि विक्रीस अयोग्य ठरलेल्या अन्नपदार्थांच्या विल्हेवाटीसंदर्भात 'एक्स्पायर, रिटर्न अँड डॅमेज फूड' हा स्वतंत्र अनुपालन आदेश जारी केला आहे. अशा प्रकारचा आदेश देशातील अन्य कोणत्याही राज्यात नसल्याचा दावा मुंढे यांनी केला.

कालबाह्य किंवा खराब झालेले अन्नपदार्थ पुन्हा वापरात आणले जाण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित कंपनीला असे अन्नपदार्थ पूर्णपणे नष्ट केल्याचा पुरावा प्रशासनाकडे सादर करावा लागणार आहे. त्यामुळे अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत कंपन्यांची जबाबदारी अधिक निश्चित होणार असल्याचे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.

संबंधित सामग्री

दिवाळीपूर्वी पुण्यात FDA ची मोठी कारवाई! 1,329 किलो संशयास्पद खाद्यपदार्थ जप्त; 6.58 लाखांचा साठा ताब्यात

दिवाळीपूर्वी पुण्यात FDA ची मोठी कारवाई! 1,329 किलो संशयास्पद खाद्यपदार्थ जप्त; 6.58 लाखांचा साठा ताब्यात

दिवाळीपूर्वी पुण्यात FDA ची मोठी कारवाई! 1,329 किलो संशयास्पद बदाम, काळे मनुके आणि डाळींचा 6.58 लाखांचा साठा जप्त.

Oct 30, 2026
FDA vs FSSAI: अन्न सुरक्षा अधिकारांवरून महाराष्ट्र सरकारची मुंबई हायकोर्टात धाव; केंद्राच्या नियमांना आव्हान

FDA vs FSSAI: अन्न सुरक्षा अधिकारांवरून महाराष्ट्र सरकारची मुंबई हायकोर्टात धाव; केंद्राच्या नियमांना आव्हान

महाराष्ट्र FDA विरुद्ध FSSAI वाद मुंबई हायकोर्टात पोहोचला. अन्न व्यवसायांच्या तपासणी अधिकारांवरील नियमांना आव्हान; पुढील सुनावणी २६ नोव्हेंबरला.

Oct 24, 2026
बिस्किटांत पशुखाद्याचा कोंडा, दुधात डिटर्जंट; FSSAI ची तीन कंपन्यांविरोधात कारवाई

बिस्किटांत पशुखाद्याचा कोंडा, दुधात डिटर्जंट; FSSAI ची तीन कंपन्यांविरोधात कारवाई

Priyagold बिस्किटांतील कोंडा, Dodla Dairy च्या दुधातील संशयास्पद घटक आणि पिवळ्या मनुकांतील कीटकनाशकांच्या अवशेषांप्रकरणी FSSAI ची कारवाई.

Oct 17, 2026
‘तक्रार करायची तिथे कर’ म्हणणे पडले महागात; ठाण्यात ५ रुपयांच्या एक्सपायर  बिस्किटावरून FDA ने ठोकले दुकानाला टाळे

‘तक्रार करायची तिथे कर’ म्हणणे पडले महागात; ठाण्यात ५ रुपयांच्या एक्सपायर बिस्किटावरून FDA ने ठोकले दुकानाला टाळे

ठाण्यात ५ रुपयांच्या मुदतबाह्य बिस्किटावरून वाद. राघव दुबे यांच्या तक्रारीनंतर FDA ने रामायण जनरल स्टोअरवर कारवाई करत दुकानाला टाळे ठोकले.

Oct 17, 2026
तुकाराम मुंढेंचा FDA मध्ये मोठा ॲक्शन प्लॅन! भिवंडी-नाशिकमधील २० हून अधिक अधिकारी निलंबनाच्या रडारवर

तुकाराम मुंढेंचा FDA मध्ये मोठा ॲक्शन प्लॅन! भिवंडी-नाशिकमधील २० हून अधिक अधिकारी निलंबनाच्या रडारवर

तुकाराम मुंढेंच्या FDA कारवाईची चर्चा; भिवंडी-नाशिकमधील २० हून अधिक अधिकारी निलंबनाच्या शक्यतेत. सुपारी प्रकरणातील चौकशी अहवालात गंभीर त्रुटी.

Oct 17, 2026