जिंतूरा गुटखा जप्त

परभणीतील जिंतूरात बोलेरोसह ७ लाख ६६ हजाराचा गुटखा जप्त

Jintur Gutkha Seized: शहरातील दादा शरीफ चौक परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी पहाटे धाडसी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा व पान मसाला वाहतूक करणारी बोलेरो गाडी पकडली.

परभणीतील जिंतूरात बोलेरोसह ७ लाख ६६ हजाराचा गुटखा जप्त

Jintur Gutkha Seized

 

स्थागुशाची कारवाई ९ जणाविरुध्द गुन्हा दाखल

जिंतूर (Jintur Gutkha Seized) : शहरातील दादा शरीफ चौक परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी पहाटे धाडसी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा व पान मसाला वाहतूक करणारी बोलेरो गाडी पकडली. या कारवाईत ७ लाख ६६ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी नऊ जणांविरुद्ध जिंतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार  ९ ऑगस्ट रोजी पहाटे १२.०५ वाजण्याच्या सुमारास दादा शरीफ चौक येथील सार्वजनिक रस्त्यावर संशयित बोलेरो एमएच २९ बीसी ३२५६) वाहनाची तपासणी करण्यात आली. त्यावेळी वाहनातून प्रतिबंधित गुटखा व पान मसाला साठा आढळून आली. कारवाईदरम्यान ६४ हजार ८०० रुपयांचा जाफरानी जर्दा तसेच १ लाख १ हजार २५० रुपयांचा  गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला. याशिवाय वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ६ लाख रुपयांची बोलेरो गाडीही ताब्यात घेण्यात आली. एकूण ७ लाख ६६ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही (Jintur Gutkha Seized) कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, पोलीस उपनिरीक्षक सवंडकर तसेच सिद्धेश्वर चाटे, नामदेव डुबे, अनिल राठोड, महेश कवठाळे, सूर्यकांत सातपुते, राम पोळ, चौरे आदी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला. स्थागुशाचे पोलीस अंमलदार सिद्धेश्वर दादाराव चाटे यांच्या सरकारी फिर्यादीवरून जिंतूर पोलिस ठाण्यात आरोपीं सय्यद वसीम सय्यद मोसिन (जमदार गल्ली, जिंतूर), अग्रवाल (हिंगोली), सचिन देशमुख (खरी प्लॉट, जिंतूर), सय्यद अवेस सय्यद चिनू (साबुन वेस, जिंतूर), फजल खान खलील खान पठाण, जफर खान खलील खान पठाण (पठाण मोहल्ला, जिंतूर), शेख मकसूद शेख चांद (ईदगाह परिसर, जिंतूर), शिवा हळदे (जिंतूर) तसेच बोलेरो वाहन मालक यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जिंतूर पोलीस करीत आहेत.