मनपा कर्मचारी आंदोलन

आंदोलक मनपा कर्मचार्‍यांनी रोखला वसमत महामार्ग

Municipal Employees Protest: कामबंद वर असलेल्या महापालिका कर्मचार्‍यांनी आपले आंदोलन अधिक तीव्र करत बुधवार २ सप्टेंबर रोजी महापालिका कार्यालया समोर वसमत रोडवर रास्ता रोको आंदोलन

आंदोलक मनपा कर्मचार्‍यांनी रोखला वसमत महामार्ग

Municipal Employees Protest

 

परभणीत मनपातील कामबंद आंदोलनाचा २४ वा दिवस

महापालिका कार्यालयासमोर रास्ता रोको?

परभणी (Municipal Employees Protest) : कामबंद वर असलेल्या महापालिका कर्मचार्‍यांनी आपले आंदोलन अधिक तीव्र करत बुधवार २ सप्टेंबर रोजी महापालिका कार्यालया समोर वसमत रोडवर रास्ता रोको आंदोलन केले. कर्मचार्‍यांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. कर्मचारी आंदोलनाला २४ दिवस उलटूनही या आंदोलनात तोडगा निघालेला नाही. जीएसटीचे अनुदान वाढवावे, फरकाची रक्कम द्यावी, थकीत वेतन, सेवानिवृत्ती, उपदान अदा करावे या मागणीसाठी महापालिका कर्मचार्‍यांनी १० ऑगस्ट पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मुंबई येथील आझाद मैदानावरही आंदोलन करण्यात आले.

मनपा कर्मचार्‍यांच्या आंदोलनाकडे (Municipal Employees Protest) शासनाचे लक्ष जात नसल्याचे दिसत आहे. कर्मचार्‍यांनी तीव्र आंदोलन करण्याची भुमिका घेतली असून बुधवार २ सप्टेंबर रोजी वसमत रोडवर रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनात सहभागी कर्मचार्‍यांनी हातात मागण्यांचे फलक घेतले होते. रास्ता रोकोमुळे वसमत रोडवर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या. आंदोलनात मोठ्या संख्येने कर्मचार्‍यांनी सहभाग नोंदवला.

संबंधित सामग्री

महापालिकेत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन!

महापालिकेत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन!

Municipal Employees Protest: लातूर महानगरपालिका नगररचना विभागातील एक प्रकरण केल्याच्या कारणावरून नगरसेवकांसह काही लोकांनी मारहाण केल्याच्या आरोपावरून लातूर महापालिकेतील कर्मचारी अधिकाऱ्यांच्या संघटन

Aug 18, 2026