चिखली (Nagpur Agreement Holi) : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ आंदोलन समितीने दिलेल्या आवाहनानुसार सोमवारी, दि. २८ सप्टेंबर रोजी चिखली येथे शेतकरी संघटनेच्या वतीने नागपूर कराराची होळी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी ‘वेगळा विदर्भ झालाच पाहिजे’ अशा घोषणा देत स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला पाठिंबा दर्शविला.
विदर्भ आंदोलन समितीच्या आदेशानुसार नागपूर कराराची होळी करण्याबाबत शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मुरली महाराज येवले यांनी चिखली पोलिसांना निवेदन दिले होते. या निवेदनात दि. २८ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात नागपूर कराराची होळी करण्याबाबत माहिती देण्यात आली होती. त्यानुसार सोमवारी दुपारी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर ऊर्फ दासा पाटील, तालुकाध्यक्ष मुरली महाराज येवले, दिनकरराव घुबे, राजू शेटे, गजानन घुगे, आत्माराम कुटे, नरहरी थुटे, सुंमता मोरे, शेषराव पाटील यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनाच्या प्रारंभी क्रांतिकारक भगतसिंग यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर नागपूर कराराची होळी करून स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी (Nagpur Agreement Holi) कार्यकर्त्यांनी विदर्भाच्या स्वतंत्र राज्याच्या मागणीसंदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘वेगळा विदर्भ झालाच पाहिजे’, ‘स्वतंत्र विदर्भ राज्य झाले पाहिजे’ अशा घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर दणाणून गेला. नागपूर करारामुळे विदर्भाच्या विकासाच्या प्रश्नांवर निर्माण झालेल्या परिस्थितीचा निषेध व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
नागपूर करार होळी
नागपूर कराराची चिखलीत होळी; स्वतंत्र विदर्भाच्या घोषणांनी परिसर दणाणला
Nagpur Agreement Holi: स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ आंदोलन समितीने दिलेल्या आवाहनानुसार सोमवारी, दि. २८ सप्टेंबर रोजी चिखली येथे शेतकरी संघटनेच्या वतीने नागपूर कराराची होळी करण्यात आली.
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Nagpur Agreement Holi
टैग्स:
Nagpur Agreement Holi