रस्ता ब्लिकर्स लाईट 

अपघात टाळण्यासाठी बसवले ब्लिकर्स लाईट 

Road Blinker Light: पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांचे मार्गदर्शनाखाली औंढा नागनाथ पोलिस ठाण्यापासून सुरू केलेल्या उपक्रमात २२ जून रोजीच्या १५० ब्लिकर लाईट स्थापित करण्यात आली आहेत.

अपघात टाळण्यासाठी बसवले ब्लिकर्स लाईट 

Road Blinker Light


पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांची संकल्पना

औंढा नागनाथ (Road Blinker Light) : दिवसेंदिवस राज्य रस्त्यावर अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून यात अनेकांना जीव गमवावा लागत आहे तर अनेक जण गंभीर जखमी होत आहेत हे अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या संकल्पनेतून २२ जून रोजी औंढा नागनाथ तालुक्यातून जाणाऱ्या रस्त्यावर ज्या ठिकाणी अपघाताची शक्यता आहे. अशा ५० ठिकाणी १५० वर ब्लिकर्स लाईट लावण्यात आले आहेत. 

दिवसेंदिवस वाहनाच्या संख्येत वाढ होत आहे तसे अपघातही वाढत आहेत त्यामुळे अपघात टाळण्यासाठी औंढा नागनाथ पोलीस ठाणे हद्दीतून औंढा नागनाथ-छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली असे राज्य महामार्ग जातात या रस्त्यावरील ज्या ठिकाणी अपघाताचे क्षेत्र आहेत अशा तालुक्यातील चिमेगाव फाटा, धार फाटा, रामेश्वर, जिंतूर टी पॉइंट, खांडेश्वरी देवी मंदिर, पिंपळदरी फाटा, बोरजा, हिवरा, भवानीमाळ, नागेशवाडी, गोळेगाव, वगरवाडी यासह अनेक ठिकाणी पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली व औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या संकल्पनेतून तसेच (Road Blinker Light) टाटा सोलर कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर प्रवीणदरसिंह, मुकुंद बीलोचन यांच्या सहकार्यातून दीडशेवर ब्लींकर लाईट लावण्यात आले आहेत.

यावेळी पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दूस, पोलीस उपनिरीक्षक अमोल इंगोले, जमादार रविकांत हरकळ,शाहेद सय्यद, ज्ञानेश्वर सावळे, वाहतूक पोलीस वसंत चव्हाण, होमगार्ड कोकाटे, पोलीस पाटील शंकर घुगे,सह इतरांची उपस्थिती होती. पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे. दरम्यान वाहन चालकांनी अपघात टाळण्यासाठी रस्त्यावरील लिंकर्स लाईट कडे लक्ष द्यावे, वाहनाचा वेग कमी करावा, सावधपणे वाहन चालवावे, वाहतूक नियमाचे पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांनी केले आहे.