नागपूर विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराविरोधात भाजयुमो आक्रमक; १८ मे रोजी ‘विद्यार्थी समस्या चर्चा’

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराविरोधात भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) आक्रमक झाला.

नागपूर विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराविरोधात भाजयुमो आक्रमक; १८ मे रोजी ‘विद्यार्थी समस्या चर्चा’

Nagpur University Issues

नागपूर (Nagpur University Issues) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराविरोधात भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) आक्रमक झाला असून, पीडित विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी १८ मे रोजी ‘विद्यार्थी समस्या चर्चा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठाच्या प्रशासनातील अनास्थेमुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात मानसिक व शैक्षणिक त्रास सहन करावा लागत आहे. निकालांमधील गोंधळ, रखडलेल्या पदव्या, पुनर्मूल्यांकन प्रक्रियेत होणारा विलंब तसेच प्रशासनाचा मनमानी कारभार यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. अनेक महाविद्यालयांकडूनही विद्यार्थ्यांची अडवणूक होत असल्याच्या तक्रारी समोर येत असून, विद्यापीठ प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे.

या पार्श्वभूमीवर भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या सूचनेनुसार भाजयुमोने पुढाकार घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारी थेट ऐकण्यासाठी सोमवार, १८ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

या चर्चासत्रात विद्यापीठाचे सिनेट सदस्य विष्णू चांगदे, भाजयुमोचे नागपूर अध्यक्ष सचिन करारे, महामंत्री रितेश पांडे, ऋषभ अरखेल, अथर्व त्रिवेदी, युवती प्रमुख प्रशंसा भोयर तसेच विद्यार्थी आघाडी प्रमुख शंतनू झाडे उपस्थित राहणार असून ते विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतील.

या कार्यक्रमात विद्यापीठाशी संबंधित कोणत्याही शैक्षणिक किंवा प्रशासकीय अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांना आपली समस्या थेट मांडता येणार आहे. भाजयुमोच्या वतीने या तक्रारींची दखल घेऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाशी चर्चा केली जाणार आहे.

नागपूर विद्यापीठाशी संलग्न सर्व पीडित विद्यार्थ्यांनी संबंधित कागदपत्रांसह या चर्चेत सहभागी व्हावे, असे आवाहन भाजयुमो अध्यक्ष सचिन करारे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9764118791, 8698444499, 7841829002, 9579727124 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तपशील :
दिनांक : सोमवार, १८ मे २०२६
वेळ : सायंकाळी ५:०० वाजता
स्थळ : भाजप कार्यालय, ५ वा मजला, मंगलम अपार्टमेंट, गणेश पेठ, नागपूर.

संबंधित सामग्री

'मंत्री-प्रशासनाची मुले बाकावर, आमची मुले जमिनीवर का?'

'मंत्री-प्रशासनाची मुले बाकावर, आमची मुले जमिनीवर का?'

CJP Abhijit Deepke: जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरावस्था पाहून संताप व्यक्त करत कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी शासन- प्रशासनाला थेट इशारा दिला आहे.

Aug 19, 2026
&quotमंत्री-प्रशासनाची मुले बाकावर, आमची मुले जमिनीवर का?&quot

केंद्रीय मंत्री श्री,अमित शाह यांच्याविरोधात काढलेल्या काँग्रेसच्या मोर्चाला कोरची युवा मोर्चाचे चोख प्रत्युत्तर

केंद्रीय मंत्री श्री,अमित शाह यांच्याविरोधात काढलेल्या काँग्रेसच्या मोर्चाला कोरची युवा मोर्चाचे चोख प्रत्युत्तर

Congress Yuva Morcha: कोरची तालुक्यात भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) ने काँग्रेसच्या वनवासी शब्दाविरोधात तीव्र प्रतिउत्तर दिला. युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विनोद कोरेटी ने आरोप केले की काँग्रेस राजकीय

Jun 09, 2026
भाजप युवा मोर्चा नांदेड महानगरची नूतन जम्बो कार्यकारणी जाहीर

भाजप युवा मोर्चा नांदेड महानगरची नूतन जम्बो कार्यकारणी जाहीर

BJP Yuva Morcha Nanded: भारतीय जनता पार्टी (भाजप)चे नांदेड महानगर युवा मोर्चा २०२६चे नूतन जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आले.

May 19, 2026
नीट परीक्षेतील पेपरफुटी भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार: लातूरमध्ये काँग्रेसची जोरदार निदर्शने

नीट परीक्षेतील पेपरफुटी भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार: लातूरमध्ये काँग्रेसची जोरदार निदर्शने

नीट परीक्षेतील पेपरफुटी, भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारामुळे संतप्त झालेल्या युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने शनिवारी केंद्रीय शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी करीत जोरदार निदर्शने करण्

May 17, 2026