Nanded Spa Center Raid

वेलनेस स्पाच्या आड वेश्याव्यवसाय; नांदेडमध्ये LCBची मोठी कारवाई; तिघांना अटक

नांदेड शहरातील फुले मार्केट परिसरात वेलनेस स्पा सेंटरच्या आड सुरू असल्याचा आरोप असलेल्या वेश्याव्यवसायाचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.

वेलनेस स्पाच्या आड वेश्याव्यवसाय; नांदेडमध्ये LCBची मोठी कारवाई; तिघांना अटक

Nanded Spa Center Raid

फुले मार्केट परिसरातील कारवाई; ४ हजार रुपये घेऊन बनावट ग्राहकामार्फत पोलिसांनी केला प्रकाराचा पर्दाफाश

नांदेड शहरातील फुले मार्केट परिसरात वेलनेस स्पा सेंटरच्या आड सुरू असल्याचा आरोप असलेल्या वेश्याव्यवसायाचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत नेपाळसह विविध राज्यांतील सात महिलांची सुटका करण्यात आली असून, घटनास्थळी आढळलेल्या तीन पुरुषांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, स्पा सेंटरचा मालक संतोष बघे पोलिसांच्या कारवाईची माहिती मिळताच फरार झाला.

फुले मार्केटमधील संबंधित वेलनेस स्पा सेंटरमध्ये अनैतिक प्रकार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. माहितीची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने एका कर्मचाऱ्याला बनावट ग्राहक म्हणून सेंटरमध्ये पाठवले. त्याच्याकडून यावेळी ४ हजार रुपये घेण्यात आले. व्यवहार झाल्यानंतर संबंधित पोलिस कर्मचाऱ्याने पूर्वनियोजित पद्धतीने बाहेर असलेल्या पथकाला संकेत दिला.

संकेत मिळताच LCBच्या पथकाने स्पा सेंटरवर धाड टाकली. छाप्यावेळी तेथे सात महिला आढळून आल्या. प्राथमिक तपासात यातील काही महिला नेपाळ, नागालँड आणि नवी दिल्ली येथील असल्याचे समोर आले. तसेच काही महिलांना ठाणे आणि पुणे येथून आणण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून पुढे आली आहे. पोलिसांनी या सर्व सात महिलांची सुटका केली.

कारवाईच्या वेळी स्पा सेंटरमध्ये उपस्थित असलेल्या तीन पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीअंती आसाममधील हीफझुल रहेमान, रहाज उद्दिन आणि याहीया अहेमद यांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणातील मुख्य संशयित असलेला स्पा सेंटरचा मालक संतोष बघे मात्र पोलिसांच्या छाप्याची माहिती मिळाल्यानंतर पसार झाला. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केली आहेत.

दरम्यान, या सेंटरमध्ये हा प्रकार नेमका किती काळापासून सुरू होता, महिलांना कोणामार्फत आणि कोणत्या पद्धतीने येथे आणले जात होते, तसेच या कथित गैरप्रकारामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. नांदेडमधील स्पा सेंटरवरील या कारवाईमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

संबंधित सामग्री

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद. नांदेडमध्ये जीवित व वित्तहानी नाही.

Oct 03, 2026
डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

लखमापूर येथे प्रतिबंधित डीजे वापरल्याप्रकरणी माहूर पोलिसांची कारवाई; पाच गणेश मंडळांच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल, १.३७ कोटींचा मुद्देमाल जप्त.

Sep 26, 2026
हिंगोली शहरासह परिसरात दोन छाप्यांत गुटख्यासह ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोली शहरासह परिसरात दोन छाप्यांत गुटख्यासह ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोलीत दोन छाप्यांत गुटखा व तंबाखूसह ३४ लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एका कारवाईत आरोपीला पकडले, तर दुसऱ्या कारवाईत आरोपी पसार झाले.

Sep 19, 2026
पिके करपली, शेतकरी चिंतेत; अन् नांदेडच्याआढावा बैठकीत AC सभागृहात काजू-बदामाचा नाश्ता

पिके करपली, शेतकरी चिंतेत; अन् नांदेडच्याआढावा बैठकीत AC सभागृहात काजू-बदामाचा नाश्ता

मराठवाड्यात पावसाची तूट असताना नांदेडमध्ये दुष्काळ आढावा बैठक झाली. बैठकीतील काजू-बदामाच्या नाश्त्याचा VIDEO व्हायरल झाल्यानंतर टीका सुरू झाली.

Sep 19, 2026
अनोळखी मृतकाची ५ तासांत ओळख; दीड लाखांच्या सुपारीतून विष पाजून हत्या, चार आरोपी जेरबंद

अनोळखी मृतकाची ५ तासांत ओळख; दीड लाखांच्या सुपारीतून विष पाजून हत्या, चार आरोपी जेरबंद

बुलढाण्यातील तढेगाव शिवारातील तरुणाच्या हत्येचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ५ तासांत उलगडा केला. दीड लाखांची सुपारी देऊन विष पाजून हत्या केल्याप्रकरणी चार आरोपी जेरबंद.

Sep 12, 2026