पोलिस अधिकारी कृष्णा सोळुंखे

जनतेच्या मनात घर करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला भावपूर्ण निरोप; कृष्णा सोळुंखे यांची नाशिकला प्रशासकीय बदली

Police Officer Krishna Solunkhe: कोटगुल पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस अधिकारी कृष्णा सोळुंखे यांची प्रशासकीय बदली नाशिक येथे झाल्याने त्यांच्या सन्मानार्थ कोटगुल पोलिस ठाण्यात भावपूर्ण निरोप

जनतेच्या मनात घर करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला भावपूर्ण निरोप; कृष्णा सोळुंखे यांची नाशिकला प्रशासकीय बदली

Krishna Solunkhe

कोरची (Police Officer Krishna Solunkhe) : कोटगुल पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस अधिकारी कृष्णा सोळुंखे (Krishna Solunkhe) यांची प्रशासकीय बदली नाशिक येथे झाल्याने त्यांच्या सन्मानार्थ कोटगुल पोलिस ठाण्यात सोमवारी दि. ११ ऑगस्ट ला भावपूर्ण निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पोलिस अधिकारी, कर्मचारी, महिला कर्मचारी, पोलिस पाटील, विविध गावांतील नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
       
दोन वर्षांच्या कार्यकाळात आपल्या जनसंपर्क, कर्तव्यदक्षता आणि जनमैत्रीपूर्ण वर्तनामुळे नागरिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणाऱ्या कृष्णा सोळुंखे (Krishna Solunkhe) यांना निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले. आतिदुर्गम गोडरी, नाडेकल, खसोडा आदी गावांतील नागरिकांनी आपल्या मनोगतातून सोळुंखे यांच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. त्यांनी दुर्गम भागातील नागरिकांशी जपलेले जिव्हाळ्याचे नाते, संकटसमयी दिलेला आधार आणि पोलिस-जनता यांच्यात निर्माण केलेला विश्वास याचा आवर्जून उल्लेख केला.
         
कार्यक्रमात शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन कृष्णा सोळुंखे (Krishna Solunkhe) तसेच त्यांच्या पत्नींचा सत्कार करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना अनेक कर्मचारी व नागरिक भावूक झाले. निरोपाच्या क्षणी निर्माण झालेले वातावरण उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेले.
       
कोटगुल पोलिस ठाण्यात यापूर्वी अनेक अधिकारी येऊन गेले. मात्र नागरिकांशी एवढी आत्मीयता, सहज संवाद आणि विश्वासाचे नाते फारच कमी अधिकाऱ्यांनी निर्माण केले, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. आपल्या कार्यकाळात आलेल्या विविध प्रशासकीय आणि कायदा-सुव्यवस्थेच्या आव्हानांचा त्यांनी धैर्याने सामना करत जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
         
दरम्यान, कोटगुल पोलिस ठाण्याचा पदभार पोलीस उपनिरीक्षक विवेक वायकर यांनी स्वीकारला असून त्यांनी नव्या जबाबदारीला सुरुवात केली आहे. तर कृष्णा सोळुंखे यांनी पत्नीसमवेत नाशिक येथे नव्या नियुक्तीच्या ठिकाणी प्रस्थान केले. बदलीनंतरही कोटगुल परिसरातील नागरिकांमध्ये त्यांच्याविषयीचा जिव्हाळा कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक कर्मचारी व्हॉट्सअॅप व फेसबुकवर निरोपाचे संदेश आणि स्टेटस ठेवून त्यांना शुभेच्छा देत आहेत.

तसेच गावकरी दूरध्वनी व संदेशांच्या माध्यमातून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत, “साहेब, पुन्हा आमच्या भागात कधी येणार?” असा भावनिक प्रश्नही विचारत आहेत. कृष्णा सोळुंखे यांचा निरोप समारंभ हा केवळ एका अधिकाऱ्याचा शासकीय निरोप नव्हता, तर जनतेच्या मनात घर करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याविषयी असलेल्या प्रेम, विश्वास आणि आपुलकीचा हृदयस्पर्शी क्षण ठरला.

संबंधित सामग्री

नाशिक पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले; पेठ, सुरगाणा आणि दिंडोरीत सौम्य हादरे

नाशिक पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले; पेठ, सुरगाणा आणि दिंडोरीत सौम्य हादरे

नाशिक जिल्ह्यात आज पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

Aug 17, 2026