NEET पेपरफुटी तपासाला वेग; पुण्यातील ब्युटी पार्लर चालक महिला पोलिसांच्या ताब्यात

देशभरात गाजलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा तपास आता अधिक वेगाने सुरू आहे.नाशिकमधून काल दोन जणांना ताब्यात घेतल्यानंतर आज पुण्यातून एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

NEET पेपरफुटी तपासाला वेग; पुण्यातील ब्युटी पार्लर चालक महिला पोलिसांच्या ताब्यात

NEET Paper Leak

पुणे (NEET Paper Leak) : देशभरात गाजलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा तपास आता अधिक वेगाने सुरू आहे. नाशिकमधून काल दोन जणांना ताब्यात घेतल्यानंतर आज पुण्यातून एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नाशिक कनेक्शन समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी आज पहाटे मनीषा वाघमारे या महिलेला ताब्यात घेतले. संबंधित महिला ब्युटी पार्लर चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ४६ वर्षीय मनीषा वाघमारे ही पुण्यातील बिबवेवाडी परिसरात राहत असून, विद्यार्थ्यांना आरोपींपर्यंत पोहोचवण्याचे काम ती करत असल्याचा संशय आहे.

NEET पेपरफुटी प्रकरणात विद्यार्थ्यांना आरोपींपर्यंत पोहोचवण्यात या महिलेची भूमिका असल्याच्या संशयावरून तिला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. अहिल्यानगरमधून अटक करण्यात आलेल्या धनंजय लोखंडे याला देखील ही महिला मदत करत असल्याचा संशय पोलिसांना आहे. तसेच विद्यार्थ्यांना धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवण्याचे काम मनीषा वाघमारे करत असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी तिच्याकडून एक मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला आहे. तसेच धनंजय लोखंडे आणि मनीषा वाघमारे यांच्यातील काही व्हॉट्सअ‍ॅप कॉल्स आणि मेसेजेसही पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून, मनीषा वाघमारे हिला आज सायंकाळपर्यंत सीबीआयच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

शुभम खैरनार सीबीआयच्या ताब्यात

दरम्यान, NEET पेपरफुटी प्रकरणातील नाशिकमधील संशयित शुभम खैरनारला घेऊन CBI टीम मध्यरात्री मुंबईकडे रवाना झाली आहे. CBI ने शुभम खैरनारचा ताबा नाशिक पोलिसांकडून घेतला असून, त्याची रात्री उशिरापर्यंत प्राथमिक चौकशी करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकचा शुभम खैरनार आणि पुण्याचा रहिवासी धनंजय लोखंडे यांनी मिळून पेपरफुटीचा कट रचला होता. धनंजयने कथितरित्या NEETचा पेपर शुभमला १० लाख रुपयांना विकला, तर शुभमने तोच पेपर टेलिग्रामद्वारे १५ लाख रुपयांना विकल्याचा आरोप आहे.

भाजपचे नेते दिनेश बिनवाल यांच्यावर परीक्षा पेपरफुटी रॅकेट आणि परीक्षा संबंधित भ्रष्टाचारात सहभागी असल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. या आरोपांनुसार, दिनेश यांनी कथितरित्या NEET 2026 चा प्रश्नपत्रिका सुमारे ₹३० लाखांना खरेदी केला आणि नंतर तीच पेपर अनेकांना लाखो रुपयांना विकला. तसेच, हा पेपर विविध सोशल मीडिया ग्रुप्सवरही त्यांनी प्रसारित केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी सीबीआयने व्यापक तपास सुरू केला असून नाशिक, पुण्यासह हरियाणा, राजस्थान आणि तेलंगणा येथेही चौकशी सुरू आहे.

संबंधित सामग्री

MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आश्वासनानंतर सामान्य प्रशासन विभागाने आदेश जारी केला.

Oct 02, 2026
पुणे महापालिकेच्या ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून खळबळ; आमदाराची आयुक्तांना धमकी, अधिकाऱ्यांनाही दमबाजी

पुणे महापालिकेच्या ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून खळबळ; आमदाराची आयुक्तांना धमकी, अधिकाऱ्यांनाही दमबाजी

पुण्यातील ९० कोटींच्या वेलस्ली रस्ता निविदेवरून वाद; आमदाराने आयुक्तांना धमकी दिल्याचा आरोप, तर अधिकाऱ्यांनाही हक्कभंगाची दमबाजी.

Sep 29, 2026
नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील निवासस्थानी पहाटे घुसखोरी; बॅगेत हातोडा, पकड आणि 10 मीटर दोरी

नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील निवासस्थानी पहाटे घुसखोरी; बॅगेत हातोडा, पकड आणि 10 मीटर दोरी

नीलम गोऱ्हेंच्या पुण्यातील घरात पहाटे तरुणाची घुसखोरी. बॅगेत हातोडा, पकड, हातमोजे आणि 10 मीटर दोरी सापडल्याने तपासाला वेग.

Sep 28, 2026
अजित पवार विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा; 10 ऑक्टोबरला ‘मफलर’ नेत्याचा पर्दाफाश करण्याची घोषणा

अजित पवार विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा; 10 ऑक्टोबरला ‘मफलर’ नेत्याचा पर्दाफाश करण्याची घोषणा

अजित पवार विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा; 10 ऑक्टोबरला VSR कंपनी आणि ‘मफलर’ नेत्याबाबत पुरावे मांडणार.

Sep 28, 2026
पुण्यात नवविवाहित IT इंजिनिअर तरुणीचा मृत्यू; हुंड्यासाठी 5 लाखांची मागणी केल्याचा आरोप

पुण्यात नवविवाहित IT इंजिनिअर तरुणीचा मृत्यू; हुंड्यासाठी 5 लाखांची मागणी केल्याचा आरोप

पुण्यात नवविवाहित IT इंजिनिअर वैष्णवी गिसरेचा मृत्यू; 5 लाखांच्या मागणीवरून छळाचा आरोप, पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा.

Sep 28, 2026