डोंगरकडा (Wild Boar Attack) : कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव शेतशिवारात शेतामध्ये काम करत असताना सोमाजी किसन वानोळे हा शेतकरी रानडुकरच्या हल्ल्यात जखमी झाला. शेतकर्यांनी जीवाची परवा न करता देखील त्याने त्या रानडुक्करास झटापट करून पकडले. आणि आरडा ओरड केला तेंव्हा आजू -बाजूला असलेले काही शेतकरी धावत आले आणि त्या सर्वांनी मिळून त्या डुकरास पकडले असल्याची घटना घडली.
भाटेगाव येथील शेत शिवारात शेतकरी सोमाजी वानोळे हा २७ जून रोजी सायंकाळी ७:३० च्या सुमारास घराकडे येत होता. तेंव्हा त्याच्यावर रानडुक्कराणे हल्ला केला, त्यात तो जबर जखमी सुद्धा झाला. डुकराच्या हल्ल्यात जखमी होऊन सुद्धा हिंमत न हारता त्याने त्याची मान पकडली आणि त्याच्यावर स्वार झाला त्यातच त्याने आरडा ओरड केला असता आजू -बाजूला असलेले शेतकरी धावत आले.आणि त्या सर्वांनी मिळून त्या डुकरास दोर खंडाच्या साह्याने बांधून ठेवले. (Wild Boar Attack) जखमी सोमाजी वानोळे ह्यास नांदेड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
भाटेगाव रानडुकर हल्ला
भाटेगावात रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी; धाडस दाखवत डुकरास पकडले..
Wild Boar Attack: कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव शेतशिवारात शेतामध्ये काम करत असताना सोमाजी किसन वानोळे हा शेतकरी रानडुकरच्या हल्ल्यात जखमी झाला.
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Wild Boar Attack