परभणी पती-पत्नी मृत्यू

परभणीत शेतात सोडलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का; पती- पत्नीचा मृत्यू

Parbhani Husband-wife Death: पालम  तालुक्यातील ऊसाच्या शेतात रानडुक्कर जावू नये म्हणून शेता भोवती बांधलेल्या तारांमध्ये विद्युत प्रवाह सोडण्यात आला. या विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का लागून पती -पत्नी.

परभणीत शेतात सोडलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का; पती- पत्नीचा मृत्यू

Parbhani Husband-wife Death

 

पालम तालुक्यातील गुळखंड येथील घटना मयत फरकंडा येथील रहिवासी

परभणी (Parbhani Husband-wife Death) : पालम  तालुक्यातील ऊसाच्या शेतात रानडुक्कर जावू नये म्हणून शेता भोवती बांधलेल्या तारांमध्ये विद्युत प्रवाह सोडण्यात आला. या विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का लागून पती - पत्नीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवार १४ जुलै रोजी सकाळी साडे नऊच्या सुमारास पालम तालुक्यातील गुळखंड येथे घडली. मयत पती- पत्नी फरकंडा येथील रहिवाशी आहेत. आशाबी महेबुब पठाण वय ३५ वर्ष, महेबुब मदारसाब पठाण वय ४० वर्ष दोन्ही रा. फरकंडा ता. पालम, असे मयतांची नावे आहेत.

याबाबत मयताचे वडिल मदारसाब नन्हुसाब पठाण यांनी पालम पोलिसात तक्रार दिली आहे. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, शेतातील ऊस पिकाचे रानडुक्करापासून संरक्षण करण्यासाठी शेताच्या भोवताली तारा लावून विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता. हा प्रवाह वेळेवर बंद न केल्याने आशाबी पठाण यांचा तारेला स्पर्श झाला आणि विजेचा धक्का बसला. पत्नीला वाचविण्यासाठी धाव घेतलेले महेबुब पठाण यांनाही विजेचा जोरदार धक्का लागला. यामध्ये पती- पत्नी दोघांचाही मृत्यू झाला. पत्नी आणि स्वत:च्या मृत्युस कारणीभूत ठरल्या प्रकरणी महेबुब मदारसाब पठाण यांच्यावर पालम पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोउपनि. लोखंडे करत आहेत.

संबंधित सामग्री

ट्रांसफार्मर बसवताना विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू 

ट्रांसफार्मर बसवताना विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू 

Electric Shock Death: कामगार बाबुराव जाधव यांचा वीज ट्रांसफॉर्मर बसवताना अचानक मृत्यू झाला. त्याच काळी वीज पुरवठा सुरू झाला असल्याचे दाखल नाही,

Jul 15, 2026
परभणीत शेतीच्या वादात दोन गटात तुंबळ हाणामारी

परभणीत शेतीच्या वादात दोन गटात तुंबळ हाणामारी

Parbhani Farm Dispute: पालम  येथे शेतीच्या वादात दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना २६ जून रोजी दुपारी साडे चार ते सायंकाळी पाच या दरम्यान पालम तालुक्यातील राहटी शेत शिवार, भोगाव या ठिकाणी घडली.

Jun 29, 2026