ग्रामविकास सरपंच संघटन

ग्रामविकासासाठी सरपंच संघटनेचे सीईओंना निवेदन

Village Sarpanch Association: जिल्ह्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवरील प्रशासकांना पूर्ववत अधिकार द्यावेत आणि प्रलंबित विकासकामांना गती द्यावी, या मागणीसाठी सरपंच संघटन

ग्रामविकासासाठी सरपंच संघटनेचे सीईओंना निवेदन

Village Sarpanch Association

हिंगोली (Village Sarpanch Association) : जिल्ह्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवरील प्रशासकांना पूर्ववत अधिकार द्यावेत आणि प्रलंबित विकासकामांना गती द्यावी, या मागणीसाठी सरपंच संघटनेने जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांना निवेदन दिले.

अधिकाराअभावी विकासकामे, निधीचा वापर आणि बिले अदा करण्यात अडचणी येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पुराव्याशिवाय चौकशी नको, वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याचा अधिकार द्यावा, वित्त आयोग व न्न्ँउRAश्उ-श्REउए अंतर्गत थकीत बिले तात्काळ द्यावीत आणि कामात अडथळा आणणार्‍यांवर कारवाईचे अधिकार प्रशासकांना द्यावेत, अशा मागण्या करण्यात आल्या.

यावेळी गायकवाड यांनी सकारात्मक चर्चा करून मागण्यांवर विचार करण्याचे आश्वासन दिले. या वेळी प्रदेश संघटक किरण घोंगडे, जिल्हाध्यक्ष माधवराव भवर, शाम कदम, रवि डोरले पाटील, राहुल करवंदे यांच्यासह मोठ्या संख्येने सरपंच उपस्थित होते.

संबंधित सामग्री

रिसोड पंचायत समितीसमोर तीव्र जनआंदोलनाचा इशारा; प्रलंबित अनुदानावरून क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक!

रिसोड पंचायत समितीसमोर तीव्र जनआंदोलनाचा इशारा; प्रलंबित अनुदानावरून क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक!

Krantikari Farmers Organization: रिसोड पंचायत समितीत शेतकर्या आणि लाभार्थी समूहांनी अनुदान प्रलंबित होण्याचा आरोप करून तात्काळ हप्ते वितरणाची मागणी केली आहे.

Jul 20, 2026