Pandhan Road

कोंडोली येथील पांदण रस्त्याची दुरावस्था!

तालुक्यातील कोंडोली शिवारातील श्री पितांबर महाराज मंदिरासमोरील एकलारा रस्तालगत असलेला गायरान पांदण रस्ता पावसाळ्यात अक्षरशः चिखलमय आणि दुष्कर बनला आहे.

कोंडोली येथील पांदण रस्त्याची दुरावस्था!

चिखलमय रस्त्यामुळे शेतीची कामे ठप्प; जनावरे चारायला नेण्यासही अडचण

मानोरा : तालुक्यातील कोंडोली शिवारातील श्री पितांबर महाराज मंदिरासमोरील एकलारा रस्तालगत असलेला गायरान पांदण रस्ता पावसाळ्यात अक्षरशः चिखलमय आणि दुष्कर बनला आहे. रस्त्यावर ३ ते ४ फूट पाणी साचत असल्याने शेतकरी, शेतमजूर आणि पशुपालक वर्गाला मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

कोंडोली शिवारातील हा मुख्य पांदण रस्ता असल्याने गावातील सर्व शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा लागतो. गाई, म्हशी, शेळ्या यांना दररोज चारण्यासाठी नेण्यासाठीदेखील याच रस्त्याचा आधार घ्यावा लागतो. मात्र, सध्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.

पावसाळ्यात रस्ता खराब असल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी खते, बियाणे, फवारणी यंत्रे आणि इतर साहित्य शेतात नेण्यास मोठा अडथळा निर्माण झाला आहे. बैलजोडी आणि ट्रॅक्टर शेतात नेता येत नसल्याने मशागत, पेरणी आणि फवारणीची कामे रखडली आहेत. त्यामुळे उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.

शेतमजूरांनाही कामावर ये-जा करताना प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. पांदण रस्त्याची दुरवस्था झाल्याने शेतीची कामे तसेच जनावरांना चारण्यासाठी नेण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

कोंडोली येथील शेतकरी आणि शेतमजुरांनी ही समस्या अनेकदा मतदारसंघातील लोकप्रतिनिधींकडे मांडून पाठपुरावा केला आहे. मात्र, कोणत्याही पक्षाच्या लोकप्रतिनिधीने कोंडोली शिवारातील पांदण रस्त्याकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शिवारातील पांदण रस्त्याची तातडीने डागडुजी व दुरुस्ती करण्यात यावी, तसेच रस्त्याचे खडीकरण व मुरमीकरण करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. पांदण रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शेती आणि जनावरांच्या चारण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी शेतकरी व शेतमजुरांकडून होत आहे.

संबंधित सामग्री

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026