पांगराशिंदे भूकंपमापक केंद्र

पांगराशिंदे येथे भूकंपमापक केंद्र कार्यान्वित

Pangrashinde Seismological Observatory: जिल्ह्यात वारंवार जाणवत असलेल्या भूकंपाच्या धक्क्यांची अचूक नोंद घेण्यासाठी पांगराशिंदे प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय भूकंपमापन विज्ञान केंद्र कार्यान्वित

पांगराशिंदे येथे भूकंपमापक केंद्र कार्यान्वित

Pangrashinde Seismological Observatory

हिंगोली (Pangrashinde Seismological Observatory) : हिंगोली जिल्ह्यात वारंवार जाणवत असलेल्या भूकंपाच्या धक्क्यांची अचूक नोंद घेण्यासाठी, त्या अनुषंगाने उपाययोजना करण्यासाठी पांगराशिंदे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय भूकंपमापन विज्ञान केंद्र कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे यांनी दिली.

हिंगोली जिल्ह्यातील भूकंपीय हालचालींचा वैज्ञानिक अभ्यास करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि (Pangrashinde Seismological Observatory) राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राचे वरिष्ठ भूकंपशास्त्रज्ञ डॉ. ए. पी. सिंग यांच्यात नुकतीच बैठक झाली होती. या बैठकीतील निर्णयानुसार ‍डॉ. सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कार्यालयीन पथकाने पांगराशिंदे येथे भूकंपमापक केंद्र सुरू केले आहे. या केंद्रात नोंदविला जाणारा भूकंपाचा डेटा‘रिअल टाइममध्ये नवी दिल्ली येथील राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राकडे पाठविला जाणार आहे. त्यामुळे भूकंपाची तीव्रता, केंद्रबिंदू आणि अन्य भूकंपीय बाबींचा तातडीने अंदाज घेण्यास मदत होणार आहे.

केंद्राद्वारे स्थानिक भूकंपीय हालचालींचे सातत्याने निरीक्षण करता येणार आहे. राष्ट्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने वेधशाळेसाठी उपलब्ध करून दिलेली आधुनिक यंत्रसामग्री येथे कार्यान्वित करण्यात आली आहे. हे केंद्र २४ तास कार्यरत राहणार आहे. त्यामुळे भूकंपाच्या हालचालींची माहिती तातडीने उपलब्ध होण्याची सुविधा होणार आहे. (Pangrashinde Seismological Observatory) भूकंपाचे निरीक्षण, नोंदणी आणि वैज्ञानिक विश्लेषणाला चालना मिळणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील भूकंपीय हालचालींचा अभ्यास आणि त्यासंबंधी अचूक माहिती संकलित करण्यासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचेही श्री. कंजे यांनी कळवले आहे.