पंकज कपूर यांची ११ एप्रिल रोजी मुलाखत

दिग्गज अभिनेते पंकज कपूर शनिवार, ११ एप्रिल रोजी वनामती येथे दुपारी ४ वाजता नागपूरकर रसिकांसमोर आपल्या कारकिर्दीचे मर्म उलगडणार आहेत.

पंकज कपूर यांची ११ एप्रिल रोजी मुलाखत

Pankaj Kapoor

नागपूरकरांसमोर उलगडणार आपल्या भूमिकांचे मर्म

नागपूर (Pankaj Kapoor) : रंगभूमी, दूरदर्शन आणि सिनेमा या तिन्ही माध्यमात आपल्या अभिनयाने रंग भरणारे दिग्गज अभिनेते पंकज कपूर शनिवार, ११ एप्रिल रोजी वनामती येथे दुपारी ४ वाजता नागपूरकर रसिकांसमोर आपल्या कारकिर्दीचे मर्म उलगडणार आहेत. अजेय गंपावर त्यांच्याशी संवाद साधतील. नागपूर एडिशन ऑफ पिफ आणि मेराकी थिएटर्सच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

एनएसडीयन असणारे पंकज कपूर मकबूल, एक डॉक्टर की मौत, जाने भी दो यारों, एक रूका हुआ फैसला, मटरू कि बिजली का मंडोला, रोजा, जलवा यासारख्या अनेक हिंदी चित्रपटांसाठी ओळखले जातात. शेक्सपिअरच्या मॅकबेथवर बेतलेली मकबूल चित्रपटातील त्यांची अब्बाजींची भूमिका तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. नुकत्याच आलेल्या जब खुली किताब या नर्म विनोदी चित्रपटातील डिंपल कपाडिया यांच्यासोबतची त्यांची जोडी सर्व स्तरातील रसिकांना आवडलेली आहे. चित्रपटात उत्तम कारकिर्द घडत असतानाही पंकज कपूर यांचे रंगभूमी आणि टेलिव्हीजनवरचे प्रेम कायम राहिले आहे. करमचंद जासूस, ऑफिस ऑफिस, मुंगेरीलाल के हसिन सपने या त्यांच्या सिरीयल्स प्रचंड गाजल्या.

जवळपास ७५ नाटकांमध्ये समृध्द अभिनयाचे प्रदर्शन करणारे पंकज कपूर उत्तम लेखकही आहेत. नॅशनल फिल्म अवॉर्ड, फिल्मफेअर या प्रतिष्ठित पुरस्कारांनी अनेकदा सन्मानित झालेले पंकज कपूर समांतर व लोकप्रिय चित्रपटातील विविध भूमिकांसाठी ओळखले जातात.

अनेक उत्तमोत्तम भूमिका साकारल्या

श्याम बेनेगल ते विशाल भारद्वाज या निरनिराळ्या पिढीतील प्रतिभावंत दिग्दर्शकांच्या चित्रपटात त्यांनी उत्तमोत्तम भूमिका वठवल्या आहेत. रिचर्ड ॲटनबरो यांच्या गांधी चित्रपटात त्याची भूमिका आहेच पण हिंदी आवृत्तीत ते गांधींचा आवाजही होते. अभिनय, दिग्दर्शन आणि लेखन यावर हुकूमत असणारे ज्येष्ठ अभिनेते पंकज कपूर, यांच्याकडून त्या त्या माध्यमातील तंत्राबाबत समजून घेण्याची ही तरुण पिढीसाठी उत्तम संधी आहे. या कार्यक्रमासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे.

 

संबंधित सामग्री

पान मसाला जाहिरातींवर सनी देओलचा स्पष्ट नकार; म्हणाला, ‘ज्या गोष्टींवर विश्वास नाही, त्यांचा प्रचार करणार नाही’

पान मसाला जाहिरातींवर सनी देओलचा स्पष्ट नकार; म्हणाला, ‘ज्या गोष्टींवर विश्वास नाही, त्यांचा प्रचार करणार नाही’

पान मसाल्याच्या जाहिरातींवरून बॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या चर्चेला आता अभिनेता सनी देओलच्या वक्तव्यामुळे नवा आयाम मिळाला आहे.

Aug 17, 2026
१५ ऑगस्टला लातूरमध्ये ‘स्वरविलास संगीत दरबार’; अभिजात शास्त्रीय संगीताची सुरेल मेजवानी

१५ ऑगस्टला लातूरमध्ये ‘स्वरविलास संगीत दरबार’; अभिजात शास्त्रीय संगीताची सुरेल मेजवानी

राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते दिवंगत विलासराव देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लातूरमध्ये ‘स्वरविलास संगीत दरबार’ या अभिजात शास्त्रीय संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे.

Aug 10, 2026
‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिरात’ सनराईज इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या भक्तिमय दिंडीचे आकर्ष

‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिरात’ सनराईज इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या भक्तिमय दिंडीचे आकर्ष

Risod Maharajswa Abhiyan: महाराष्ट्र शासन, तहसील कायम करत 'छत्रपती शिवाजीच्या महाराजस्व अभियान' योजनेसाठी रिसोड येथे आयोजित एक सांस्कृतिक कार्यक्रमात सनराईज इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी

Jul 27, 2026
कांद्री येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेतकरी संवाद मेळावा व उत्कृष्ट शेतकरी सत्कार सोहळा संपन्न

कांद्री येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेतकरी संवाद मेळावा व उत्कृष्ट शेतकरी सत्कार सोहळा संपन्न

Farmers Sanvad Melava: राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेपासून शेतकर्यांना मिळाले उत्कृष्ट मान्यवरांचे सत्कार आणि वृक्षारोपण, जयंती महोत्सवासाठी आयोजित कार्यक्रमात स्थानीय स्तरावर जनसंचालन हा प्रमुख विषय.

Jul 26, 2026