परभणी जनगणना 2026

परभणीत जनगणनेच्या कामात हलगर्जी; पर्यवेक्षक, प्रगणकांवर गुन्हा...!

Parbhani Census 2026: जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा केल्याने जनगणना पर्यवेक्षक, प्रगणक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ४ जून रोजी नवा मोंढा, नानलपेठ पोलिसात एकूण दहा जणांवर गुन्ह्याची नोंद

परभणीत जनगणनेच्या कामात हलगर्जी; पर्यवेक्षक, प्रगणकांवर गुन्हा...!

Parbhani Census 2026

 

नवा मोंढा, नानलपेठ पोलिसात नोंद दहा जणांचा समावेश...!

परभणी (Parbhani Census 2026) : जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा केल्याने जनगणना पर्यवेक्षक, प्रगणक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ४ जून रोजी नवा मोंढा, नानलपेठ पोलिसात एकूण दहा जणांवर गुन्ह्याची नोंद झाली आहे.

सध्या जनगणनेचे काम सुरू आहे. या (Parbhani Census 2026) कामासाठी जनगणना पर्यवेक्षक, प्रगणक यांची नेमणूक करण्यात आली आहे. संबंधित कर्मचार्‍यांना राष्ट्रीय जनगणना कामी हजर राहावे, असे आदेशित करुन सुध्दा सदर कर्मचारी जनगणनेच्या कामाला हजर झाले नाहीत. कर्तव्य पार पाडण्यात सदर कर्मचार्‍यांनी कसूर केल्याने त्यांच्यावर लोकप्रतिनिधीत्व अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

अधीक्षक जनगणना सय्यद आवेज हाश्मी यांनी नवा मोंढा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन मोहम्मद सनाउल्ला खान, प्रभाकर भोंडवे, प्रशांत रेंगे, अनंत किरडे, जब्बार अली खान, गोविंद रोडे, सचिन लोहट यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोह. टाक करत आहेत. तर सय्यद जुबेर हाश्मी यांनी नानलपेठ पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन दिपक बन, अनंत कदम, संतोष शेळके यांच्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास सपोउपनि. पवार करत आहेत.

टैग्स: Parbhani Census 2026