परभणी कंत्राटी कामगार

परभणीत कंत्राटी कामगारांच्या वेतनवाढीवर तोडगा नाही..

Parbhani Contract Workers: परभणीतील कंत्राटी कामगारांना वरचिका देण्याच्या मागणीत सर्वसाधारण एकता राहिली नाही. मात्र, स्वाभिमानी संघांनी कायमच पुढे येण्याचा निर्णय घेतला.

परभणीत कंत्राटी कामगारांच्या वेतनवाढीवर तोडगा नाही..

Parbhani Contract Workers

 

कुलगुरु-स्वाभिमानी संघटनेची बैठक निष्फळ
कृषि विद्यापीठातील कामबंद आंदोलन सुरूच राहणार

परभणी (Parbhani Contract Workers) : स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या प्रशासकीय भवनासमोर सुरू असलेल्या कंत्राटी कुशल, अर्धकुशल व अकुशल कामगारांच्या कामबंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवार ६ ऑगस्ट रोजी कुलगुरूंसोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

किमान वेतन, विशेष भत्ता, ईएसआय आणि शासनाच्या नियमानुसार वेतनवाढ लागू करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या कार्यालयात बैठक झाली.  बैठकीला कुलगुरू डॉ. इंद्र मणी, आ. डॉ. राहुल पाटील, कुलसचिव काळे, भगवान आसेवार, ठोंबरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे  मराठवाडा विभागीय अध्यक्ष किशोर ढगे, रामप्रसाद गमे, विकी जोंधळे, शरद रनेर, बालाजी रनेर, शशी शिंदे, प्रताप चव्हाण, राधिका रनेर तसेच महिला कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत विद्यापीठ प्रशासनाने अकुशल कामगारांच्या वेतनात प्रती दिवस  ५० रुपये, तर कुशल कामगारांच्या वेतनात २०० रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव दिला.

मात्र संघटनेने अकुशल कामगारांना प्रती दिवस २०० रुपये आणि कुशल कामगारांना ३०० रुपये वाढ देण्याची मागणी कायम ठेवली. तसेच सर्व कंत्राटी कामगारांना त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार किमान वेतन अधिनियम १९४८ नुसार योग्य वेतन, विशेष भत्ता, कर्मचारी राज्य विमा (ईएसआय) आणि शासनाच्या सर्व निर्णयांची अंमलबजावणी करण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली. दोन्ही बाजूंमध्ये वेतनवाढीच्या मुद्द्यावर एकमत न झाल्याने बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे प्रशासकीय भवनासमोरील कंत्राटी कामगारांचे कामबंद आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वाभिमानी कामगार संघटनेने घेतला आहे.

संबंधित सामग्री

जंतर-मंतर लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ परभणी बंद; व्यापारी, सामाजिक संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जंतर-मंतर लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ परभणी बंद; व्यापारी, सामाजिक संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Parbhani Bandh: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी पुकारलेल्या परभणी बंदला व्यापारी, दुकानदार, विविध सामाजिक संघटना...

Jul 23, 2026