पाथरी नगरपरिषदेत लेखणीबंद आंदोलन न.प.कर्मचार्‍यांच

परभणीत नगरसेवकांच्या धमकीनंतर मुख्याधिकार्‍यांना हृदयविकाराचा झटका

मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांना  नगरसेवक तथा माजी आ.बाबाजानी दुर्राणी यांनी फोनवर धमकीवजा शिवीगाळ केल्याचा आरोप समोर आला. या घटनेनंतर  मुख्याधिकारी सोनवणे यांना हृदयविकाराचा झटका आला.

परभणीत नगरसेवकांच्या धमकीनंतर मुख्याधिकार्‍यांना हृदयविकाराचा झटका

Pathari Nagar Parishad

परभणी (Pathari Nagar Parishad) : पाथरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांना  नगरसेवक तथा माजी आ.बाबाजानी दुर्राणी यांनी फोनवर धमकीवजा शिवीगाळ केल्याचा आरोप समोर आला असून या घटनेनंतर  मुख्याधिकारी सोनवणे यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे नगरपरिषद कर्मचार्‍यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ बुधवार १८ मार्च नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांनी लेखणीबंद आंदोलन पुकारले आहे.

या संदर्भात कर्मचार्‍यांनी जिल्हाधिकारी यांना बुधवार १८ मार्च रोजी निवेदन सादर करून   नगरसेवक माजी आ.बाबाजानी दुर्राणी यांनी मुख्याधिकार्‍यांशी दूरध्वनीवरून शिवीगाळ करत धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. या मानसिक तणावामुळेच मुख्याधिकार्‍यांना हृदयविकाराचा झटका आल्याचेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे. दरम्यान या आंदोलनामुळे दिवसभर नगरपरिषदेचे कामकाज ठप्प झाले असून नागरिकांची विविध कामे रखडली आहेत. 

या (Pathari Nagar Parishad) संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी सोमवार १६ मार्च झालेल्या अर्थसंकल्पीय सभेशी जोडली जात आहे. या  सभेला विरोधी नगरसेवकांनी बहिष्कार टाकला होता तर सत्ताधार्‍यांनी ४२२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर याच विषयावरून संबंधित नगरसेवक व मुख्याधिकारी यांच्यात वाद झाल्याची शहरात दबक्या आवाजात चर्चा होती. दरम्यान कर्मचार्‍यांनी लेखणीबंद आंदोलन करत या प्रकरणाला अधिकृत दुजोरा दिल्याने पाथरी नगरपरिषदेत निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून  घडलेल्या या प्रकारामुळे प्रशासन व राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.